Friday, November 14, 2025
Home बॉलीवूड बिग बॉस फेम अब्दू रेजिक 5 वर्षाचा असताना ‘या’ घातक अजाराला पडला होता बळी, अभिनेत्यानेच स्वत:च केला खुलासा

बिग बॉस फेम अब्दू रेजिक 5 वर्षाचा असताना ‘या’ घातक अजाराला पडला होता बळी, अभिनेत्यानेच स्वत:च केला खुलासा

बिग बॉस‘ 16 फेम अब्दू रोजिक (Abdu Rozik) हा एक सिंगर आणि बॉक्सर म्हणून ओळखला जोते. त्याचे वय आणि उंची जरी कमी असली तरी तो आपल्या कौशल्याने लाखो लोकांच्या मनावर राज्य करत असून बॉलिवूड सेलिब्रिटी देखिल त्याचे मोठे फॅन आहेत. बिग बॉसच्या घरामध्ये गेल्यापासून अब्दूचे अजूनच चाहते झाले आहेत. तो घरामध्ये नेहमी सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचे सोशल मीडियावर लाखो चाहते असून तो लाखो लोकांची प्रेरणा बनला आहे.

बिग बॉसच्या घरातील सगळ्यात क्युट आणि प्रसिद्ध स्पर्धक अब्दू रेजिक सोशल मीडियावर सगळ्यांचा क्रश बनला आहे. अब्दू मुळचा ताजाकिस्तानचा आसून सगळ्यात छोटा गायक म्हणून इंटरनेटवर सेंसेशनपेक्षा कमी नाही. बोहेरच नाही तर घरामध्ये देखिल अब्दुच्या क्युटनेसचे फॅन झाले आहेत. मात्र, एवढा क्युट आणि हॅंडसम असलेला अब्दूची गोष्ट तेवढीच दु:खदायी आहे. त्याने दिलेल्या एकामुलाखतीत स्वत:ची उंची का कमी आहे. त्याच्याबद्दल माहिती सांगितली होती की, तो 5 वर्षाचा असताना रिकेट्स आणि हार्मोन्सच्या आजाराच्या बळी पडला होता. त्यामुळे त्याच्या शरीराची वाढ झाली नाही.

अब्दूचे शरीर अगदी 8-9 वर्षाच्या लहान मुलासारखे आहे. पण याच्या मागचे करण म्हणजे त्याचा भयानक आजार, माध्यमातील वृत्तानुसार त्याने दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान अब्दू रोजिकने सांगितले होते की, आपल्या उंचीमुळे त्याला खूप लोकांचे बोलने खावे लागले आहे, पण लोकांच्या टोमण्यावरुन त्याने नाराज होऊन रडत बसण्यापेक्षा त्याने काहीतरी वेगळे करुन दाखवण्याचे ठरवले. आपल्या आतमधील दुर्गणांना पाहण्यापेक्षा त्याने आपल्या कमतरतेलाच आपली ताकद बनवली आणि आज तो आपल्यासमोर एक आदर्श व्यक्ती म्हणून ऊभा आहे.

बिग बॉसच्या घरामध्ये सगळ्यात जास्त चांगले काम अब्दू करत आहे. आपल्या विनम्र आणि भोळ्या स्वभावाने सगळ्यांनाच आपलंसं करुन घेतो. घरामध्ये त्याच्याएवढे कंटेट कोणचदेत नाही. भले त्याल हिंदी बोलता येत नाही आणि समजतही नाही मात्र, तरीही तो चाहत्यांचा आवडता स्पर्धक बणला आहे. अब्दू एक चांगल्या रॅपर सोबत तो एक प्रसिद्ध ब्लॉगरही असून त्याचं युट्युब चॅनलही आहे जे खूपच चर्चामध्ये असते. 3 सप्टेंबर 2003 साली ताजाकिस्तानच्या पंजाकेट जिल्ह्यातील गिशदरवा गावामध्ये अब्दूचा जन्म झाला होता. त्याचे ओही दिल जोर हे गाणं खूपच गाजलं होतं. आता तो फक्त ताजाकिस्तानच नाही तर संपूर्ण भारतात लोकप्रिय झाला आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अय्याे! या भाेजपुरी अभिनेत्रीनं स्विमसूटमध्ये केलं फाेटाेशूट; चाहते म्हणाले, ‘दिल गार्डन-गार्डन…’
कांजीवरम साडी अन् केसांत गजरा शैहनाजचा व्हायरल लूक

हे देखील वाचा