बिग बॉस हा टेलिव्हिजनवरील सर्वांत वादग्रस्त शो म्हणून ओळखला जातो. बिग बॉसच्या घरात दिल्या जाणाऱ्या आदेशांना कोणाचा आवाज दिला आहे, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. तर बिग बॉसच्या आवाजामागचा खरा चेहरा व्हाईस आर्टिस्ट रत्नाकर तारदळकर (Ratnakar Tardalkar) यांचा आहे. हे एक व्हॉइस आर्टिस्ट आहे. मराठी बिग बॉसच्या पहिल्या सिझनसाठी रत्नाकर यांनी ऑडिशन दिली होती. बिग बॉसच्या आयोजकांना त्यांचा आवाज खास वाटला आणि बिग बॉससाठी रत्नाकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला. रत्नाकर हे पार्ल्याचे रहिवासी आहे.
रत्नाकर पार्ल्याला राहायचे तिथून सेटवर त्यांना लोणावळ्याला बोलावले जायचे. त्यामुळे ह्या प्रवासात त्यांचे खूपच हाल होत होते. मात्र आता हा शो फिल्मसिटीमध्येच होत असल्याने त्यांना ते सोयीस्कर झाले आहे. बिग बॉसच्या दुसऱ्या सिजनमध्ये शिवानी सुर्वे हिने गोंधळ घातला होता. त्यावेळी रत्नाकर यांना रात्रीच लोणावळ्याला यावे लागले होते. एखाद्या कठीण प्रसंगात आपल्या आवाजामुळे आपुलकी वाटावी, सदस्यांना समजावता यावे म्हणून त्यांनी अनेक बारकावे शिकून घेतले होते. या कामात त्यांना वेळोवेळी त्यांच्या सहकाऱ्यांची देखील मोठी मदत मिळते. बिगबॉस हा बिग बॉसच्या घराचा महत्वाचा भाग आहे. त्यामुळे ह्या घरात जे कोणी सदस्य येतील त्यांना पाहुण्यांसारखे वागवावे लागते.
त्यांचे स्वागत करून त्यांना या घरात आपुलकी वाटावी यासाठी आवाजात आत्मीयता आणावी लागते. माझा आवाज यासाठी योग्य वाटला आणि म्हणूनच माझी या भूमिकेसाठी निवड करण्यात आली असे रत्नाकर तारदाळकर म्हणतात. अर्थात ही ओळख लपून राहिली नसल्याने आता आज काय घडलं म्हणून त्यांना अनेकांचे फोन येत असतात. आयोजकांनी हे सर्व गुप्त ठेवण्याची ताकीद त्यांना दिली आहे. बिग बॉसच्या मागचा खरा चेहरा समोर आला असला तरी त्यांना या घरातील बाबी उघड करता येणार नाहीत हे त्यांनी अगोदरच स्पष्ट केले आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बादशाह ‘या’ पंजाबी अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा, वर्षभरापासून करत आहे डेटिंग !
साऊथच नाही, तर कोरिअन चित्रपटांचाही रिमेक करून बसलाय बॉलिवूड, यादीत तुमचाही आवडता सिनेमा