बॉलिवूडची ब्युटीक्वीन म्हणून ओळखली जाणारी उर्वशी रौतेला ( Urvashi Rautela)पुन्हा एकदा जोरदार चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी तिचे आणि भारतीय क्रिटेपटू रिषभ पंत (Rishabh Pant) याच्यासोबत नाते होते. मात्र, या गोष्टीची पुरेपुर फायदा फक्त उर्वशीनेच उचलला आहे. सोशल मीडिया वादमुळे हे दोघे वेगळे झाले. रिषभने तर चक्क पोस्ट टाकली होती की, पिछा सोड ताई, पण तरीही उर्वशी काय पंतचा पिछा सोडायला तयारच नाही. अभिनेत्री चित्रपटांपेक्षा जास्त आपल्या सोशल मीडियामुळे नेहमी लोकांचे लक्ष वेधत असते. आता पुन्हा एकदा उर्वशीने एक अशी पोस्ट टाकली आहे, ज्यामुळे रिषभची खिल्ली उडाली आहे.
मिस युनिवर्सचा खिताब मिळवणारी सुंदरी उर्वशी रौतेला हिने पुन्हा एकदा लोकांच्या नजरेत .येण्यासाठी सोशल मीडियाद्वारे एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे लोक तिला ट्रोल करत आहे. अभिनेत्रीसाठी या गोष्टी नवीन नाहीत. ती नेहमी प्रेक्षकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असते. ती काय रिषभ पंतचा पिछा सोडत नाही असे दिसून येत आहे. आशिया चषकाचा सामना असताना रिषभच्या मागे थेट दुबइच्या स्टेडियममध्ये तिने हजेरी लावली होती. त्यामुळे तिला भयंकर ट्रोल केले होते. मात्र, तरीही अभिनेत्री थांबली नाही, तिने आपल्या इंस्टा अकाउंटवरुन पाकिस्तानचा क्रिकेटर नसीम शाहा सोबत आपले नाव जोडले होते. तेव्हाही ती खूपच चर्चेत आली होती.
आता पुन्हा एकदा उरेवशीने हद्दच पार केली आहे. तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन एक फोटो शेअर करत चक्क करवा करवा चौथ सणाच्या शुभेच्या दिल्या आहेत. अभिनेत्रीने पुन्हा एकदा रिषभचा पाठलाग करत ऑस्ट्रेलिया गाठले आहे. या फोटोमध्ये उर्वशीने पांढऱ्या रंगाचा टॉप, लाला रंगाचा स्कर्ट आणि मॅचिंग रंगाचा हेअरबॅंड लावून कॅन्डिड पोजमध्ये फोटोशूट केले आहे.
View this post on Instagram
फोटो शेअर करत थेट करवा चौथच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा पोस्ट शेअर करत असताना कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “आशा करते की, “चंद्राच्या प्रकाशासारखं तुमच्या आयुष्यात आनंद, शांती आणि सद्भानेनं भरुन जावं. इन अडवान्स करवा चौथच्या शुभेच्छा.” या शुभेच्छामुळे तिला लग्ना अगोदरच शुभेच्छा देत पाहूनल चाहते तिला ट्रोल करत आहेत. त्यासोबतच रिषभच पंतचेही नाव जोडले जात आहे. या फोटोवर चाहत्यांनी कमेंट करत लिहिले आहे की, ‘उर्वशीने क्रिकेटर रिषभ पंतला करवा चौथचे आमंत्रण दिले आहे.’दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘दिदी फोटोबरोबर दर्दभरी शायरी लिहिली नाही का?,’ एवढ नाही तर एकजाने लिहिले की, ‘करवा चौथचा उपवासही धरनार का?’ असे प्रश्न विचारत अभिनेत्रीला ट्रोल केले जात आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
चाळिशी पार करूनही श्वेता दिसतेय विशीतली तरुणी, हॉट फोटो गॅलेरी पाहाच
लेट नाईट पार्टीत जाणे अक्षयला पडले महागात; भडकलेले चाहते म्हणाले, ‘झोपला नाही, सकाळी 4ला कसा उठणार’