साऊथ इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री रकुल प्रीत सिंग हिने आपल्या अभिनयाच्या बळावर बॉलिवूडमध्ये चांगले स्थान निर्माण केले आहे. अभिनेत्री जॅकी भगनानीसोबत बऱ्याच दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. अनेकदा त्या दोघांच्या लग्नाच्या चर्चा सोशल मीडियावर रंगतात. आता अभिनेत्रीच्या भावाने ह्या लग्नाबद्दल माहिती दिली आहे. 2023 मध्ये हे कपल लग्नाच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे.
रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh)आणि जॅकी भगनानी (Jackky Bhagnani) अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहे. दोघेही एकमेकांना पसंत करतात आणि त्यांच्या नात्याला पुढे नेऊ इच्छितात. माध्यमांतील वृत्तानुसार, रकुलच्या भावानेही या नात्याला होकार दिला आहे. रकुलचा भाऊ अमनने सांगितले की, “रकुलने जॅकीसोबत काही प्रोजेक्ट्समध्ये काम केले आहे. दोघेही एकमेकांना आवडतात आणि त्यांना लग्न करायचे आहे. सध्या लग्नाबाबत कोणतीही तारीख ठरलेली नाही. पण रकुल स्वतः याबद्दल सर्वांना सांगणार आहे. जॅकीकडे अनेक मोठे प्रोजेक्ट्स आहेत आणि रकुलही तिच्या प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. अशा परिस्थितीत दोघेही विचारपूर्वक लग्नाचा निर्णय घेतील.”
लग्न होईल वेगळ्या पद्धतीने
रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी हे खूप क्यूट कपल आहे. दोघंही एकमेकांवर खूप प्रेम करतात. अशा परिस्थितीत काही मित्रांचे म्हणणे आहे की, “लग्न 2023 मध्ये होणार आहे.” वासू भगनानी (Vashu Bhagnani)यांचा मुलगा जॅकी भगनानीचे रकुलसोबतच्या लग्नासाठी सर्वजण उत्सुक आहे आणि तारखेची वाट पाहत आहे. दुसरीकडे, मोठ्या प्रमाणावर आपले चित्रपट प्रदर्शित करणारे वासू भगनानी आपल्या मुलाचे लग्न वेगळ्या पद्धतीने करण्यास उत्सुक आहे. याबाबतचा निर्णय रकुल घेणार असून लग्नाबाबतची घोषणाही रकुल करणार असल्याची माहिती मिळत आहे.
गेल्या वर्षी, जॅकी भगनानीने रकुलच्या वाढदिवशी एका फोटोसह आपल्या नात्याची अधिकृत घोषणा केली होती. त्याची ही पोस्ट रकुलनेही शेअर केली होती. रकुलने मागील एका मुलाखतीत सांगितले होते की, “जर आपल्याला कोणी आवडत असेल, तर त्यात लपवण्यासारखे काय आहे? मी अशी अनेक जोडपी पाहिली आहेत ज्यांना त्यांचे नाते मान्य नाही. मला वाटतं नात्यात आदर आणि प्रेम असलं पाहिजे, ते लपवून ठेवण्याची गरज नाही.”
रकुल प्रीत दिसणार ‘डाॅक्टर जी’ या चित्रपटात
रकुल प्रीत सिंगच्या वर्कफ्रंट विषयी बोलायचे झाले, तर अभिनेत्री लवकरच आयुष्मान खुरानासोबत ‘डॉक्टर जी’ ह्या चित्रपटात दिसणार आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
विराट कोहलीने खरेदी केला किशोरदांचा बंगला! दिल्लीनंतर मुंबईत सुरू करणार ‘हा’ बिझनेस
जेव्हा पहिल्या भेटीतच लीना यांनी नाकारले किशोर कुमार यांचे प्रपोसल, पुढे ‘अशी’ झाली लव्हस्टोरीला सुरुवात