बॉलिवूडची ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत शबाना, त्यांचे पती प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर आणि एक महिला दिसत आहेत. या महिलेचे नाव जयश्री असे आहे. हा फोटो व्हायरल होण्यामागचे कारण म्हणजे त्यांचे कपडे. या फोटोत शबाना आझमी आणि जावेद अख्तर नवीन ड्रेसमध्ये दिसत आहेत. अभिनेत्रीने हा फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.
आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या या फोटोत शबाना आझमी यांनी निळ्या रंगाची साडी आणि मरून रंगाचे ब्लाऊज परिधान केले आहे, तर जावेद अख्तर पांढर्या कुर्ता-पायजमामध्ये दिसत आहेत. शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांना जयश्रीने हे कपडे भेट म्हणून दिले आहेत. हा फोटो शेअर करत शबाना आझमी यांनी एक खास पोस्टही लिहिली आहे.
अभिनेत्रीने लिहिले की, “जयश्रीच्या मुलीचे लग्न झाले आणि तिने आमच्यासाठी ही भेटवस्तू घेतली, जी आम्ही घातली आहे.” त्या पुढे म्हणाल्या, “हे कपडे एखाद्या कोपऱ्यात फेकण्याऐवजी, आम्ही तिची भेटवस्तू वापरण्याचा निर्णय घेतला आणि ते कपडे घातले. तिने तिच्या मेहनतीच्या पैशातून ही भेटवस्तू खरेदी केली. त्याबद्दल आम्ही मनापासून आभारी तिचे आहोत.”
अलीकडेच, एका मुलाखती दरम्यान शबानाने या चाहतीबद्दल आणि त्या भेटवस्तूबद्दल सांगितले की, “ती माझी चाहती नाही. ती आमच्या घरात काम करणारी जयश्री आहे. गेली 12 वर्षे ती आमच्याबरोबर राहत आहे आणि शेवटपर्यंत मी तिच्यावर प्रेम करेन. ती आमच्या कुटुंबाचा एक अविभाज्य भाग आहे. जेव्हा तिच्या मुलीचे लग्न झाले, तेव्हा तिने हे पारंपारिक महाराष्ट्रीयन कपडे आम्हाला भेट म्हणून दिले होते.
या फोटोनंतर शबाना आझमी सोशल मीडियावर खूप चर्चेत आल्या. शबाना आझमींच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर त्या अखेरच्या वेळी नेटफ्लिक्सच्या ‘काली कुही’ या हॉरर चित्रपटात दिसल्या होत्या. या चित्रपटात त्यांच्यासोबत संजिता शेख, सत्यदीप मिश्रा, रीवा अरोरा यांच्यासह अनेक कलाकार मुख्य भूमिकेत होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-रिया चक्रवर्तीमुळे ‘चेहरे’ अडचणीत; मात्र निर्मात्यांचा अभिनेत्रीला पूर्ण पाठिंबा!










