बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर हीने खूप कमी कालावधीत चित्रपटसृष्टीत आपले नाव कमावले आहे. दिग्गज अभिनेत्री श्रीदेवी हीची मुलगी असूनही तीने तिच्या मेहनतीने चित्रपटसृष्टीत तिचे नाव कमावले आहे. जान्हवी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. आपल्या आयुष्यशी निगडित प्रत्येक गोष्टींचा खुलासा ती प्रेक्षकांसोबत करत असते.
तिचा रूही हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. सर्वत्र या चित्रपटाची चर्चा चालू आहे. या चित्रपटात तिच्यासोबत राजकुमार राव हा मुख्य भूमिकेत आहे. तसेच वरुण शर्मा याने देखील महत्वाची भूमिका निभावली आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव असून व प्रेक्षक फारसे घराबाहेर पडत नसूनही हा चित्रपट चांगले यश मिळवत आहे. या चित्रपटाचे यश साजरे करताना जान्हवीने तिच्या इंस्टाग्रामवरुन ‘आस्क मी एनीथिंग’ या सेशनद्वारे प्रेक्षकांशी जोडली गेली होती. याचा अर्थ प्रेक्षकांना तीने ‘तुम्ही कोणतेही प्रश्न विचारा मी त्याचे उत्तर देईल’ असे सांगितले. त्यावेळी तिने अनेक प्रश्नांची उत्तरे दिली.
या सेशनमध्ये जान्हवीला तिच्या फॅन्सने अनेक गमतीशीर प्रश्न विचारले होते आणि तिने तितक्याच गमतीने या प्रश्नांची उत्तरे देखील दिली होती. यामध्ये एका युजरने तिला किस करण्यापर्यंत देखील प्रश्न विचारला होता. या युजरने तिला प्रश्न विचारला की,” मी तुला किस करू शकतो का?” तेव्हा जान्हवीने अगदी मजेशीर अंदाजात या युजरला उत्तर दिले. तिने एक सेल्फी पोस्ट करून या युजरला उत्तर दिले.

जान्हवीने या युजरला उत्तर देते वेळी तोंडावर मास्क लावून फोटो काढला. या फोटोला शेअर करत तिने स्पष्ट शब्दात नाही असे उत्तर दिले आहे. जान्हवी कपूरचा रूही हा चित्रपट नुकताच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. सुरुवातीला या चित्रपटाची कमाई जास्त नव्हती.पण नंतर चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळायला लागला आहे.










