तमिळ अभिनेता थीपेत्ती गणेशन याचे सोमवारी (22 मार्च) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अचानक तब्येत बिघडल्यानंतर त्याला तमिळनाडूच्या मदुराई येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गणेशनच्या मागे पत्नी व दोन मुले असे कुटुंब आहे. त्याच्या निधनाने तमिळ चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.
दिग्दर्शक सीनू रामास्वामी यांनी ट्विटरवर थीपेत्तीच्या निधनाबद्दल माहिती दिली आणि त्याला श्रद्धांजली वाहिली. त्यांनी तमिळ भाषेत लिहिले की, “माझा भाऊ कार्ती उर्फ थीपेत्ती गणेशनच्या निधनाने मला धक्का बसला आहे. तब्येत बिघडल्यानंतर तो मदुराई येथील राजाजी शासकीय रुग्णालयात होता. माझ्या चित्रपटांमध्ये काम करणाऱ्यांपैकी तो एक सर्वोत्कृष्ट अभिनेता होता. त्याच्या आत्म्यास शांती लाभो.”
எனது படங்களில் நடித்து வந்த சிறந்த நடிகன் தம்பி கார்த்தி என்ற தீப்பெட்டி கணேசன் உடல்நலக்குறைவு காரணமாக மதுரை இராஜாஜி அரசு மருத்துவமனையில் காலமான செய்தி கேட்டு உள்ளம் கலங்கினேன்.அன்புநிறை
இதய அஞ்சலி கணேசா.. pic.twitter.com/TWQIHHgElt— R.Seenu Ramasamy (@seenuramasamy) March 22, 2021
गणेशनला ‘बिल्ला 2’ या चित्रपटातून प्रसिद्धी मिळाली होती. या व्यतिरिक्त त्याने ‘थेनमेर्कू परुवकात्रू’, ‘उस्ताद होटल’, ‘नीरपरावाई’ आणि ‘कन्ने कलाईमाने’ यांसारखे चित्रपट केले आहेत. लॉकडाऊन दरम्यान गणेशनला आर्थिक संकटाचाही सामना करावा लागला होता.
त्याने एक व्हिडिओ पोस्ट करून, बिल्ला 2 मधील त्याचा सहकारी अभिनेता आणि तमिळ फिल्म सुपरस्टार अजितकडे काम देण्यासाठी आग्रह केला होता. तो म्हणाला होता की, आता त्याच्याकडे कोणतेही काम नसल्या कारणाने त्याला बऱ्याच संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्याच्या या व्हिडिओनंतर त्याला इंडस्ट्रीतील बर्याच लोकांनी मदत केली होती. ज्यामुळे त्याच्या अडचणी थोड्या प्रमाणात कमी झाल्या.
सीनू रामास्वामीच्या कन्ने कलाईमाने या चित्रपटात गणेशनला अखेरच्या वेळेस पाहिले गेले होते. हा चित्रपट 2019 साली प्रदर्शित झाला होता.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-विष्णू विशाल आणि ज्वाला गुट्टा चढणार लग्नाच्या बोहल्यावर? अभिनेत्याने केली मोठी घोषणा
-‘या’ अभिनेत्याचे ट्रान्स्फॉर्मेशन पाहून तुम्ही व्हाल थक्क, केले तब्बल १८ किलो वजन कमी










