टेलिव्हिजनवरील ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेने सगळ्यांचे मनोरंजन केले आहे. या मालिकेच्या जबरदस्त यशामागे मुख्य कारण म्हणजे या मालिकेतील कलाकार आणि त्यांचा दमदार अभिनय. या मालिकेतील असे एक पात्र आहे, जे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आले आहे. ते पात्र दुसरं तिसरं कोणी नसून दयाबेन म्हणजेच दिशा वकानी हिच्या पात्राला सगळ्यांनीच खूप प्रेम दिले. दिशाने सन २०१७ मध्ये मॅटरनिटी ब्रेक घेतला होता. त्यानंतर ती या मालिकेत परत नाही आली. त्यामुळे सर्वत्र अशी चर्चा आहे की, दिशाने ही मालिका सोडून दिली आहे.
माध्यमांतील वृत्तानुसार, दिशाने घेतलेल्या ब्रेकच्या दरम्यान तिच्यामध्ये आणि शोच्या निर्मात्यांमध्ये ती परत येण्यावरून चर्चा चालू होती. परंतु योग्य संधी न मिळाल्याने त्यांना नीट बोलता आले नाही. याच कारणामुळे दिशा वकानीने ‘तारका मेहता का उलटा चष्मा’ ही मालिका सोडून जाण्याचा निर्णय घेतला आहे.
याच दरम्यान अशी देखील चर्चा चालू होती की, दयाबेन या पात्रासाठी इतर कोणाची तरी निवड करण्यात येणार आहे. या मालिकेच्या निर्मात्यांनी दुसरी अभिनेत्री देखील शोधली आहे. परंतु तिच्यामध्ये दयाबेन सारखी कोणतीच गोष्ट दिसून येत नाहीये. टेलिव्हिजनवरील राखी विजान या अभिनेत्रीने देखील दयाबेनची भूमिका साकारण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण तिच्याबाबत अजून काही ठाम निर्णय घेतला नाही. त्यामुळे आता दयाबेनची भूमिका कोण निभावणार हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेने मागील दशकात प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. परंतु दिशा वकानी ही मालिका सोडणार आहे, ही बातमी आली तेव्हापासून प्रेक्षकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात या मालिकेच्या टीआरपीला धक्का बसू शकतो.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-पांढऱ्या रंगाच्या चादरमध्ये ‘ही’ अभिनेत्री दिसली टॉपलेस, फोटो शेअर करत म्हणतेय ‘वो पहला प्यार’
-विष्णू विशाल आणि ज्वाला गुट्टा चढणार लग्नाच्या बोहल्यावर? अभिनेत्याने केली मोठी घोषणा