छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय टीव्ही मालिकांपैकी एक ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ आता ऍनिमेटेड स्टाईलमध्ये परतणार आहे. या लोकप्रिय शोचा पहिला एपिसोड, 28 जुलै 2008 रोजी प्रसारित झाला होता. गेल्या 13 वर्षात या शोचे 3125 एपिसोड प्रसारित झाले आहेत. ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ हा एक कौटुंबिक करमणूक कार्यक्रम आहे, जो प्रेक्षकांना खूप आवडतो आणि आता हा कार्यक्रम मुलांचा चॅनल सोनी ये! (Sony Yay!) वर अॅनिमेटेड रूपात आणला जात आहे.
चॅनेलने या नवीन शोचा प्रोमो व्हिडिओ रिलीज केला आहे. ज्यामध्ये शोच्या मुख्य पात्रांची झलक पाहायला मिळाली. ‘जेठालाल’, ‘दयाबेन’, ‘टप्पू’ आणि ‘बापूजी’ यांसारख्या सर्व लोकप्रिय पात्रांना कार्टून शोने मुख्य स्थान दिले आहे, जी शोची मूळ पात्र आहेत.
सोनी येच्या इंस्टाग्रामवर प्रोमो रिलीज करताना निर्मात्यांनी लिहिले की, “आमच्या नवीन शोमधून टप्पूचा लूक जाहीर करण्यास आम्ही खूप उत्सुक आहोत. लवकरच येत आहे.” या शोबद्दल चाहतेही खूप उत्साहित आहेत. याव्यतिरिक्त हा कार्टून शो मुलांच्या चॅनेलवर लहान मुलांसाठी आणला जात आहे. त्यामुळे टप्पूच्या व्यक्तिरेखेला जरा जास्त प्राधान्य देण्यात येईल, अशी अपेक्षा आहे. पण जेठालालचे संपूर्ण कुटुंब प्रोमोमध्ये दाखवले गेले आहे.
छोट्या पडद्यावर, गोकुळधाम सोसायटीचे लोक बर्याच काळापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आले आहेत. आता हेच मनोरंजन लवकरच प्रेक्षकांना ऍनिमेटेड स्टाईलमध्ये दिसणार आहे. तसेच, यातील सर्व पात्रांना हुबेहूब दर्शविण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला आहे.
शोच्या प्रोमोवरून असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, शोचा अॅनिमेटेड अवतार टप्पू आणि त्याच्या कुटुंबाच्या आसपासच राहील. यापूर्वी शोचे मुख्य अभिनेते दिलीप जोशी म्हणाले होते की, वेळेसोबत शोचे लिखाण जरासे बदलले आहे. शेवटचे काही भाग त्यांच्या अपेक्षेनुसार नव्हते. पुढे ते म्हणाले, जेव्हा तुम्ही संख्या पाहता, तेव्हा गुणवत्तेवरही कुठेतरी त्याचा परिणाम होतो.
त्यांनी सांगितले की, यापूर्वी हा कार्यक्रम साप्ताहिक होता आणि लेखकांना बराच वेळ होता. चार भाग आता लिहिले, तर पुढील चार भाग पुढील महिन्यात लिहिता येत होते. त्यामुळे याच्या गुणवत्तेवर परिणाम झाला नाही. म्हणून आता अॅनिमेटेड शोचा प्रश्न आहे की, हा अॅनिमेटेड शो कधी सुरू होईल. आतापर्यंत हे फक्त कमिंग म्हणून सांगितले जात आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-भल्या भल्यांना रडवणाऱ्या कंगना रणौतला ‘या’ कारणामुळे अश्रू अनावर
-कंगना रणौतच्या ‘थलायवी’चा ट्रेलर रिलीज; अभिनेत्रीच्या दणदणीत आवाजाने हबकला प्रेक्षकवर्ग