बाॅलिवूडची लाेकप्रिय अभिनेत्री सोनम कपूर हिचे काका संजय कपूर यांचा आज 60 वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने सोनमने तिच्या काकांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. सोनमने तिच्या सोशल मीडिया हँडलवर काही जुन्या आठवणी शेअर केल्या आहेत. तिने तिच्या इंस्टाग्रामवर संजय कपूरसोबतचे बालपणीचे अनेक फोटो शेअर केले आहेत. यासोबतच तिने तिन्ही कपूर ब्रदर्सच्या जुन्या दिवसांचा फोटोही शेअर केला आहे.
हे सर्व फोटो शेअर करत सोनम(sonam kapoor) हिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “हॅपी बर्थडे काका!! आम्ही सर्व तुमच्यावर खूप प्रेम करतो !! तुम्ही आमचे लाडके काका आहात. आम्ही आशा करतो की, आपण सर्वजण असेच हसत, खेळत तुमच्यासोबत नेहमी पार्टी करत राहू. हजारो वर्षे जगा, 60 च्या शुभेच्छा.”
View this post on Instagram
सोनमचे काका संजय कपूर यांनी या हृदयस्पर्शी पोस्टवर कमेंट केली आहे. संजयने कमेंट करत लिहिले की, “लव्ह यू टू.” संजयची पत्नी आणि सोनम कपूरची मावशी महीप कपूरही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. या पोस्टवर त्यांनी हार्ट इमोजीसह कमेंटही केली आहे. या दोघांशिवाय सोनमच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत संजय कपूरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावर्षी दुबईत साजरा करणार सजंय कपूर त्याचा 60वा वाढदिवस
संजय कपूर यावर्षी त्याचा वाढदिवस दुबईत साजरा करत असून त्याचे जवळचे मित्र आणि कुटुंबीय सेलिब्रेशनसाठी दुबईला पोहोचले आहेत. कोरिओग्राफर फराह खानसह त्याचे जवळचे मित्र चंकी पांडे आणि भावना पांडे संजय कपूरच्या वाढदिवसाच्या पार्टीला उपस्थित राहणार आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
अरे वाह! ‘सजनिया’ गाण्यावर माधुरीने लावले ठुमके, व्हिडिओ पाहून गायक झाला खुश
‘आज ओरडू नका मॅडम’, पॅपराजींनी तापसीला विनंती; पाहा अभिनेत्रीने काय दिले उत्तर