Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

आलिया भट्ट ‘या’ रुग्नालयात देणार बाळाला जन्म! कपूर कुटुंबीयांनी बाळाच्या आगमनासाठी…

बॉलिवूडमध्ये सगळ्यांचे लक्ष वेधणारी जोडी म्हणजे आलिया भट्ट आणि रणबीर कपूर. यांनी आपल्या ब्रह्मास्त्र चित्रपटापासून, लग्न आणि प्रेग्नेंसिच्या बातमीने खूपच क्रेज मिळवला होता. सोशल मीडियावर याच जोडीचे चर्चे होते. आता आलिया लवकरच आई होणार आहे. त्यामुळे तिच्या बाळाचा जन्म कुठे आणि कसा होणार याचे प्रत्येकचजनच वाट पाहात आहे. नुकतंच त्यांच्या घरातील एका जवळच्या व्यक्तीने आलियाच्या बाळंतपणाची माहिती दिली आहे.

आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या 8 वा महिना सुरु आहे आणि आता तिची डिलेव्हरीची तारीख देखिल जवळ आली आहे. आलिया नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी किंवा डिसेंबर मध्ये पहिल्याच आठवड्यात बाळाला जन्म देणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. कपूर कुटुंबाच्या बाळासाठी आधीच सगळ्या सोयसुविधा केल्या आहेत. आलियाचे बाळ कोणत्या रुग्नालयात जन्माला येणार आहे याची बातमी समोर आली आहे. आलियाचे नाव गिरगावातील एका रुग्नालयात नोंदविण्यात आले असून तिच्यासाठी एक खोलीदेखिल बुक करुन ठेवली आहे.

माध्यमातील वृत्तानुसार आलिया एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये तिच्या बाळाला जन्म देणार आहे. हे रुग्नालय मुंबई गोरेगावामध्ये स्थायी आहे. याच रुग्नालयात अभिनेता रिषी कपूर यांनी अखेरचा श्वास घेतला होता. आलिया बाळाला जन्म दिल्यानंतर मोठा ब्रेक घेणार आहे. ती पूर्णवेळ आपल्या बाळासोबत घालवणार आहे.तिने आणि रणबीरने आपल्या बाळाच्या सोयीनुसार आधिच सगळी तयारी करुन ठेवल्याचे कळले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranbir kapoor ???? (@ranbir_kapoooor)

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलियाने नुकतंच एका मुलाखतीत सांगितले होते की, “आम्ही आमच्या येणाऱ्या बाळासाठी, जे काही आवश्यक आहे, त्या सगळ्या गोष्टी निवडल्या आहेत. आम्हा आमच्या बाळासाठी एक खोलीदेखिल तयार करुन ठेवली आहे.” हे दोघे 5 वर्षापासून एकमेकांना डेट करत होते. यानंतर त्यांनी ब्रह्मास्त्र चित्रपटाची शूटिंग संपल्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranbir kapoor ???? (@ranbir_kapoooor)

आलिया आणि रणबीरच्या लग्नाची सगळ्यांनाच खूप उत्सुकता लागली होती मात्र, यांचे लग्न फक्त जवळचे मीत्र आणि नातेवाइकांनाच आमंत्रित करण्यात आले होते. सोशल मीडियाद्वारे आलियाच्या लग्नाच्या फोटोंने तर धमालच केली होती. त्यांच्या कपड्यांपासून ते भेटवस्तूपर्यत चांगल्याच चर्चा रंगल्या होत्या. यांनंतर आणियावने अगदी 4 महिन्यातच प्रेग्नेंसिची बातमी देऊन सगळ्यांनाच धक्का दिला होता. आलियाने प्रग्नेंट असतानाही कामामध्ये ब्रेक घेतला नाही. तिने आधि हार्ट ऑफ स्टोन चित्रपटाचे शुटिंग पुर्ण केले. यानंतर तिने आपल्या प्रोडक्शन हाउसमध्ये डार्लिंग आणि ब्रह्मास्त्र चित्रपटाचे दमदार प्रमोशन केले. त्यामुळे आलियाचे अनेकांनी कौतुक केले होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
काय ते कॉलेज,काय ती मुलं, काय ते पोस्टर सगळं कसं ‘एकदम कडक’
वैशाली ठक्करच्याच्या 5 पानांच्या पत्राने केला मोठा खुलासा! ‘या’ कारणामुळे घेतला होता गळफास

हे देखील वाचा