कॉमेडियन सुदेश लहरी याचे नाव ऐकली की चेहऱ्यावर हासू येते, याचे कारण म्हणजे त्याची कॉमेडी.सुदेशने बॉलिवूडच्या अनेक चित्रपटामध्ये आपल्या दमदार कॉमेडीने लोकांना पोट धरुन हसण्याला भाग पाडला आहे. शुक्रवारी (दि. 27 ऑक्टोंबर) रोजी आपला वाढदिवस साजरा करत आहे. आज या खास दिवशी कॉमेडियनच्या आयुष्यातील काही खास गोष्टी जाणून घेऊन.
लोकप्रिय कॉमेडियन सुदेश लहरी (Sudesh Lahiri) याचा जन्म 1964 साली पंजाबच्या जालंधर गावामध्ये झाला होता. त्याच्या घरामधील परिस्थिती खूप खराब होती त्याने आपल्या आयुष्यामध्ये खूप संघर्ष केला आहे. आपले करिअर बनवण्यापूर्वी सुदेशने घर चालवण्यासाठी चहा विकण्याचे काम करत होता. जरी तो चहा विकत असला तरी त्याच्या घरी चाय बनत नसे कारण त्याची परिस्थिती होती.
View this post on Instagram
माध्यमातील वृत्तानुसार सुदेशने एका मुलाखतीदरम्यान त्याने आपल्या मागील आयुष्याला उजाळा दिला होता. त्याने सांगितले होती की, तो खूप गरीब घरातून आला आहे. घर चालवण्यासाठी त्याने कारखान्यापासून ते कुल्फी आणि भाजी देखिल विकली आहे. एवढा संघर्ष करुनही त्याने आपल्या आतमधील कलेला जिवंत ठेवले होते. अभिनेताला लहाणपनापासूनच गाणे गाण्याची फार आवड होती मात्र, परिस्थितीमुळे त्याला जास्त खुलता आले नाही. पण आता तो ही संधी सोडत नाही, तो आपल्या युट्युब चॅनेलवर गाणे गात असतो, आणि कार्यक्रमामध्येही तो आपले कौशल्या दाखवत असतो. सुदेश आपल्या गावामध्ये ऑर्केस्ट्रामध्येही काम केले आहे. तो या कार्यक्रमामध्ये सुत्रसंचालनासोबत मिमिक्रीही करत होता. त्याला चित्रपटामध्ये काम करण्याचाही नाद होता. त्याने बॉलिवूडमध्ये अभिनेता सलमान खान (Salman Khan) सोबत ‘रेडी’ आणि ‘जय हो’ सारख्या चित्रपटामध्ये काम केले आहे. तो लहाणपनी खिशातमध्ये पैसे नसले तरीही चित्रपट गृहामध्ये चित्रपट पाहात असे यासाठी त्याने खूप चांगली शक्कल लढवली होती.
मुलाखती दरम्याने त्याने सांगितले होते की, तो एका दिवसामध्ये चार चार चित्रपट पाहात असे, यासाठी तो लाईनमध्ये लागून लोकांना म्हणत असे की, चित्रपट बघण्यासाठी माझ्याकडे 10 पैसे कमी आहेत, ज्यामुळे लोक त्याची मदत करत आसे आणि त्याची चित्रपट बघण्याची व्यस्था होऊन जात असे. सुदेशने आपल्या करिअरची सुरुवात टेलिव्हिजनवरील प्रसारित कार्यक्रम ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चैलेंज’ या पासून केली होती. मात्र, त्याला खरी ओळख ‘कॉमेडी सर्कस’ आणि ‘कॉमेडी क्लासेस’ या कार्यक्रमामधून मिळाली. त्याने यामध्ये अभिनेता कृष्णा अभिषेक (Krushana Abhishek) सोबत काम केले होते, त्यांच्या जोडीला चाहत्यांनी खूप पसंत केले होते.
हेही वाचा-
–‘तुमची आठवण…’ लक्ष्मीकांत बेर्डेंच्या वाढदिवसानिमित्ताने लेकीची भावुक पोस्ट; चाहते म्हणाले, ‘लक्ष्या मामा…’
–तापसी पन्नू-स्वरा भास्करला का म्हटलं होतं ‘बी ग्रेड’? अखेर कंगनाने सांगितलं कारण; म्हणाली…