Wednesday, March 12, 2025
Home अन्य भाईजानच्या एक्स गर्लफ्रेंडचा कार अपघात, रुग्णालयात उपचार सुरु

भाईजानच्या एक्स गर्लफ्रेंडचा कार अपघात, रुग्णालयात उपचार सुरु

प्रसिद्ध अभिनेत्री रंभा इंद्र कुमार हिने बॉलिवूडच नाही तर, अनेक भाषांमध्ये काम केले आहे. ‘जुडवा’, ‘घरवाली बाहरवाली’, ‘क्योंकी मैं झूठ नाहीं बोलता’ सारख्य्या गाजणाऱ्या अनेक चित्रपटामध्ये रंभाने आपली छाप सोडली आहे. तिने 2010 साली कॅनडाचे उद्योगपती तिरुमला याच्याशी लग्न केले होते. तिला लग्नानंतर दोन मुली झाल्या त्यामुळे ती अभिनय क्षेत्रापासून जरा लांब आहे. मात्र, ती सोशल मीड्यावर नेहमी सक्रिय असते. तिने नुकतंच तिच्यासोबत घडलेल्या एका धक्कादायक घडनेबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे.

सुप्रसिद्ध अभिनेत्री रंभा इंद्र कुमारव (Rambha Indra Kumar) हिने साउथ, कन्नड, तेलुगू, बंगाली, बॉलिवूड सारख्या अनेक चित्रपटामध्ये काम केले आहे. ती जरी अभिनय क्षेत्रापासून लांब असली तरी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. लग्न झाल्यापासून अभिनेत्री कॅनडामध्येच स्थायी झाली आहे. नुकतंच अभिनेत्रीने आपल्या ट्वीटर अकाउंटवरुन एक पोस्ट शेअर करत तिच्यासोबत घडलेल्या घटनेबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे.

अभिनेत्री रंभाचा कॅनडामध्ये कार अपघात झाला आहे. त्याकारमध्ये अभिनेत्रीच्या दोन्ही मुलीसह सांभाळ करणारी महिला बसल्या होत्या. अचानक कारचा ऑक्सीडन्ट झाला. झालेल्या अपघातामध्ये कोणाचेही गंभीर नुकसान झाले नाही. मात्र, रंभाची मुलगी साषा हिचे दवाखाण्यामध्ये उपचार सुरु आहेत. त्यामुळे अभिनेत्रीने आपल्या चाहत्यांना विनंती केली आहे की, तिच्या मुलीच्या उपचारासाठी प्रार्थना करा.

ही घटना घडल्यानंतर अभिनेत्रीने इंस्टाग्राम आणि ट्वीटरवर अपघाताच्या कारचे फोटो शेअर केले आहेत. तिच्याकडे टेस्ला कंपनीची कार होती, ज्याच्या उजव्या बाजूच्या दरवाज्यावर दुसऱ्या कारणे धडक दिली होती. दरवाजा पुर्णपणे बाद झाला आहे. ही घटना मुलांना शाळेतून परत आणत असताना घडली होती. रंभाने आपल्या ट्वीटद्वारे म्हटले आहे की, “आम्हाला काही जास्त दुखापत झाली नाही मात्र, साषा दावाखान्यामध्ये उपचाकर घेत आहे.” सांगितले आहे.

फोटोमध्ये पाहिले तर गाडीतील सर्व एअरबॅग बाहेर आलेल्या दिसत आहे. गाडीचे फार नुकसान झाले असून खीप मोठा अपगात घडल्याचे दिसून येत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
हॅपी बर्थडे ऐश्वर्या I तुम्हाला माहितीये अभिषेकसोबत लग्न होण्यापूर्वीही ऐश्वर्याचं लग्न झालंय, विश्वास बसत नसेल तर ही बातमी वाचा
‘मला माफ करा भाईजान…’; असं काय घडलं की केआरकेनं जोडले सलमानपुढे हात

हे देखील वाचा