Monday, February 24, 2025
Home बॉलीवूड अजूनही एडल्ट चित्रपटांचा व्यवसाय करताे राज कुंद्रा? सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना दिले प्रत्युत्तर

अजूनही एडल्ट चित्रपटांचा व्यवसाय करताे राज कुंद्रा? सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना दिले प्रत्युत्तर

बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राचे नाव आल्यापासून दोघांच्या नात्याची बरीच चर्चा साेशल मीडियावर रंगली आहे. त्यांच्या घटस्फोटाच्या अफवाही खूप उडाल्या आहेत. अलीकडेच राज कुंद्राने सोशल मीडियावर आस्क राज सेशन  चालवले. यावेळी ट्रोलसने त्याच्यावर चागंलाच प्रश्नांचा वर्षाव केला आणि राज कुंद्रानेही ट्राेलर्सच्या प्रश्नांना उत्तरे दिली. 

राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीचे लग्न आहे केवळ देखावा?
आस्क राज या सेशनमध्ये, एका साेशल मीडिया युजर्सने राज कुंद्रा (raj kundra) याला त्याच्या लग्नाबद्दल विचारत कमेंट केले की, “तुम्ही आणि शिल्पा एकत्र आहात की फक्त एक कपल असण्याचा दिखावा करत आहात?” यावर उत्तर देताना राज कुंद्रा म्हणाला, “मला हा प्रश्न आवडला. प्रेम हे एक्ट नाही आणि त्याच ढोंग देखील करता येत नाही.” आस्क राज सत्रात काही लोकांनी राजकुंद्राला सतत मास्क घालण्याबद्दलही प्रश्न केला. यावेळी राज कुंद्रा म्हणाले की, “मी चाहत्यांसाठी नाही तर मीडियासाठी मुखवटा घालतो.”

राज कुंद्रा करताे अजूनही पॉर्न चित्रपटांचा व्यवसाय?
राज कुंद्राला पाॅर्नग्राफी संदर्भात देखील युजर्सने प्रश्न विचारले. ट्रोलरने कमेंट करत लिहिले, “सर, तुम्ही अजूनही पॉर्न चित्रपटांचा व्यवसाय करता का?” यावर उत्तर देताना राज कुंद्रा म्हणाला, “कधी केले नाही, कधी करणार नाही.” यादरम्यान एका युजरने शमिताच्या लग्नाबद्दलही प्रश्न विचारला.

मीडियापासून का राखताे राज कुंद्रा अंतर
राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणी तुरुंगातही गेला हाेता. यादरम्यान शिल्पा शेट्टी (shilpa shetty) हिने अनेक मंदिरांना भेटी दिल्या आणि पतीची ढाल बनून उभी राहिली. राज कुंद्रा तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांनी मीडियापासून अंतर राखायला सुरुवात केली होती, पण आता हळूहळू लोकांसमोर येत आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
18 वर्षांच्या संघर्षानंतर ‘कांतारा’चा अभिनेता कसा बनला सुपरस्टार? जाणून घ्या एका क्लिकवर
बिनधास्त गर्ल! सई ताम्हणकरचा सोज्वळ लुक होतोय व्हायरल…

हे देखील वाचा