Thursday, October 16, 2025
Home मराठी ‘टिकली न लावून भारत माताला विधवासारखं…’; म्हणत, संभाजी भिडेंनी फटकारले महिला पत्रकाराला

‘टिकली न लावून भारत माताला विधवासारखं…’; म्हणत, संभाजी भिडेंनी फटकारले महिला पत्रकाराला

हिंदु कार्यकर्ता संभाजी भिडे सतत आपल्या सडेतोड वक्तव्यामुळे आणि हिंदु घर्माचे रक्षण करण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी काही वर्षापूर्वी भिमा कोरेगाव या ठिकाणी दंगली पेटवल्या होत्या तेव्हापासून संभाजी भिडे सतत चर्चेत असतात. नुकतंच त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक महिला पत्रकार त्यांचीशी बोलण्यासाठी जाते तेव्हा ते तिला चांगलेच फटकारतात.

हिंदु दक्षिणपंथी कार्यकर्ता संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी काही वर्षापूर्वी भिमा कोरेगावामध्ये  केलेल्या कृत्यामुळे खूपच चर्चेत आले होते त्यामुळे त्यांना कारावस देखिल सहन करावा लागला होता. मात्र, तरीही ते हिंदू धर्मावर बिंदास्त वक्तव्य करत असतात. नुकतंच एक महिला पत्रकार त्यांच्याशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत मुलाखतीविषयी प्रतिक्रिया मागत होती. मात्र, संभाजी भिडेंने प्रतिक्रिया न देता महिला पत्रकाराला टिकली का लावली नाही, यावरुन जडोरदार फटकारले.

महिला पत्रकाराला टिकली नाही लावली म्हणून फटकारत संभाजी भिडे तिला म्हटले की, “एक महिला भारत मातेच्या समान असते आणि तिला टिकली न लावून विधवा सारखं दाखवू नका.” असे म्हणत भिडेंनी महिलेला जोरदार फटकारले. झाले असे की, संभाजी भिडे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या भेटीसाठी गेले होते. ते ऑफिसमधून बाहेर आल्या नंतर एका महिला पत्रकाराने त्यांच्या मुलाखतीबद्दल प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी सांभाजी भिडेकडे गेली होती. मात्र, भिडेंनी तिच्या प्रश्नाचे उत्तर न देता तिलाच टिकली न लावल्यामुळे जोरदार फटकारले. तेव्हा कॅमरामॅनने हे दृष्य आपल्या कॅनेरामध्ये कैद केले आणि आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

भीमा-कोरगाव हिंसाचारानंतर प्रसिद्धीच्या झोतात आलेले संभाजी भिडे यांनी 2018 मध्ये सांगितले होते की, त्यांच्या बागेतील आंबे खाल्ल्यानंतर अनेक जोडप्यांना मुलगे झाले आहेत. मात्र, त्यांच्या या विधानावर जोरदार टीका झाली. भिडे यांचा दावा खोटा असल्याचे सांगत एका सामाजिक कार्यकर्त्याने आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता, असे महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. यानंतर त्यांच्या वक्तव्यावर नाशिक महापालिकेने नोटीस बजावली आहे. नोटीसमध्ये मनपाने भिडे यांना त्यांच्या शेतातील आंबे खाल्ल्यानंतर मुले झालेल्या जोडप्यांची नावे सांगण्यास सांगितले आहे. त्याचा दावा सिद्ध करण्यासही सांगितले होते. संभाजी भिडे सतत आपल्या वक्तव्यामुळे लोकांच्या नजरेत येत असतात त्यामुळे अनेक लोक त्यांना ओळखू लागले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
वृत्तपत्राची एडिटर ते एक नावाजलेली अभिनेत्री, ‘असा’ आहे सोनाली कुलकर्णीचा अभिनयप्रवास
राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेला बॉलिवूड अभिनेत्री पूजा भट्टचा पाठिंबा, फोटो होतायेत तुफान व्हायरल

हे देखील वाचा