हॉलिवूडमधील बहुचर्चित चित्रपट ‘द सुसाइड स्क्वॉड’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीझ झाला आहे. हा चित्रपट 6 ऑगस्ट 2021 रोजी सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात जॉन सीना आणि मार्गोट रॉबी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावताना दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक ‘जेम्स गन’ यांनी या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे.
‘द सुसाईड स्क्वॉड’ हा चित्रपट एका कॉमिक पुस्तकावर आधारित असणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर खूपच जबरदस्त आहे. या चित्रपटात खलनायकाच्या नायक बनण्याची कहाणी दाखवली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांना खूपच आवडला आहे. जेम्स गन यांनी या चित्रपटाचा ट्रेलर शेअर करत असे लिहले आहे की, “आमचा पहिला ट्रेलर.”
Our first trailer. Warning: gore & adult language & supervillains & adventure & heart. Can't wait to see it in a theater with all of you on August 6. #TheSuicideSquad pic.twitter.com/HdqlGVP0lB
— James Gunn (@JamesGunn) March 26, 2021
ट्रेलरमध्ये अनेक एनिमेटेड पात्र आहेत जी मानवाच्या बरोबरीने या दुनियेला वाचवताना दिसत आहे. या चित्रपटात कोरोना महामारीला दाखवण्यात आले आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये मार्गोट रॉबी यांचा जबरदस्त अंदाज पाहायला मिळतो. डब्ल्युडब्ल्युईचा सुपरस्टार जॉन सीना हा देखील या चित्रपटात आहे.
चित्रपटाचा ट्रेलर बघून एखादया कॉमिक बुक चित्रपटाला बघत असल्याचा भास होतोय. यामध्ये कलाकारांनी खूप चांगला अभिनय केला आहे. जेम्स गन यांनी असेच काम मार्व्हल स्टुडिओच्या गार्डियन ऑफ द गॅलक्सी फ्रँचायझीमध्ये केले होते.
विशेष म्हणजे या चित्रपटात काम करणारा जॉन सीना हा पाच वेळा युनायटेड स्टेट्स चॅम्पियन, चार वेळा वर्ल्ड टॅग टीम चॅम्पियन आणि 16 वेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरला आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-आलियानंतर राम चरणचा ‘या’ चित्रपटातील लूक व्हायरल, मिळतोय जबरदस्त प्रतिसाद
-चित्रपटात बेड सीन देताना शाहरुखने केलं ‘असं’ काही, काजोलसह सर्वजण झाले होते चकित