मेगास्टार अमिताभ बच्चन हे ‘कौन बनेगा करोडपती‘ शोमध्ये अनेकदा अनेक मनोरंजक खुलासे करतात. अशातच यावेळी त्यांनी स्पर्धक विद्या उदय रेडकर यांच्याशी संवाद साधताना ते स्वत:ला इतके फिट कसे ठेवतात याचा खुलासा केला. यासाेबतच ते काेणकाेणते अन्न खाणे टाळतात याविषयीही ते माेकळेपणाने बाेलले. महत्वाचे म्हणजे जया बच्चनला मासे आवडत असतान ते आहरात मांसाहारी अन्नाचा का समावेश करत नाही याबाबतही ते बाेलले.
केबीसीमध्ये एका संभाषणादरम्यान अमिताभ बच्चन (amitabh bachchan) यांनी स्पर्धक विद्याला तिच्या आवडत्या खाद्यपदार्थाबद्दल प्रश्न विचारला होता. तिने सांगितले की, “ती मांसाहारी आहे आणि तीला मासे खायला खूप आवडतात.” यानंतर विद्याने अमिताभ बच्चन यांना विचारले, “मी बरोबर असेल तर जयाजींनाही मासे खायला आवडतात, नाही का सर?” याला उत्तर देताना बिग बी म्हणाले की, “त्यांना मासे खूप आवडते.” यावर विद्याने अमिताभ यांना विचारले, “तुम्हालाही मासे आवडतात का?” यावर अमिताब बच्चन म्हणाले, “मी सर्व काही सोडले आहे. आता मी अनेक गोष्टी खाणे बंद केले आहेत. आता जसे की, मी मांस खाणे सोडले आहे, भात खाणे सोडला आहे, पान खाणे सोडले आहे, अलीकडे मिठाई खाणे देखील सोडले आहे.
शोमध्ये संभाषणादरम्यान, स्पर्धक विद्या अमिताभ बच्चन यांना सांगते की, “लोक इथे पैसे कमवण्यासाठी येतात, पण मी तुम्हाला भेटायला आले आहे.” हे ऐकून बिग बींनी म्हंटले की, “तुम्ही इतर कुठेही भेटू शकत हाेतात.” यावर विद्या म्हणते, “माझी 22 वर्षांची तपश्चर्या आज फळाला आली आहे.” विद्या ही व्यवसायाने विमा एजंट असून अर्धवेळ लेखापाल म्हणून काम करते. ती 1 लाख 60 हजांरावर पोहोचली होती. मात्र, यानंतर ती एका प्रश्नावर थांबली आणि 80 हजार रुपये घेऊन शो साेडला.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दक्षिण केरलच्या 32 हजार महिला अपाहरण घटनेला ‘या’ चित्रपटाने दिला ऊजाळा, पाहाच एकदा ट्रेलर
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी ‘या’ ठिकाणी अडकणार लग्नबंधनात, समोर आली मोठी माहिती










