Thursday, March 13, 2025
Home बॉलीवूड ‘खूप भारी दिसतेय’, हिना खानच्या समुद्रावरील ग्लॅमरस फोटोंवर चाहत्याची कमेंट

‘खूप भारी दिसतेय’, हिना खानच्या समुद्रावरील ग्लॅमरस फोटोंवर चाहत्याची कमेंट

टीव्ही अभिनेत्री हिना खान प्रत्येक दिवशी कोणत्या ना कोणत्या कारणाने ती चर्चेत असते. हिना सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ नेहमीच ती सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच तिने तिच्या नवीन फोटो शूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

या फोटोत हिनाने पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाचा‌ ड्रेस घातला आहे. ती या फोटोमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोमध्ये ती टोंड बॉडी फ्लॉन्ट करताना दिसत आहे. तिच्या या कातील अदा बघून चाहते घायाळ झाले आहेत.

या फोटोत ती समुद्रातील एका बोटीवर बसलेली दिसत आहे. यावर बसून तिने पोझ दिले आहेत. या फोटोत तिने हॅट घातली आहे, तर डोळ्यांवर काळ्या आणि पांढऱ्या रंगाचा गॉगल घातला आहे. हिना जे काही घालते ती फॅशन होऊन जाते. तिने पारंपरिक पोशाख घातला किंवा वेस्टर्न घातला, तरी तिच्या चाहत्यांसाठी ती स्टाईल बनत असते.

सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे तिच्या प्रत्येक फोटोला भरभरून प्रेम मिळत असते. तिच्या या फोटोला देखील प्रेक्षकांकडून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होताना दिसत आहे. एका चाहत्याने तिच्या कमेंट करत ‘खूप भारी दिसतेय’ असे लिहिले आहे. तिचे इंस्टाग्रामवर 11 मिलियन फॉलोवर्स आहेत.

हिना खान तिच्या ‘यह रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून घराघरात पोहोचली. या मालिकेतील तिच्या ‘अक्षरा’ या पात्राने तिला ओळख मिळवून दिली. तसेच ती ‘खतरों के खिलाडी’मध्ये स्पर्धक होती. ‘बिग बॉस 11’ मध्येही सामील झाली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आलियानंतर राम चरणचा ‘या’ चित्रपटातील लूक व्हायरल, मिळतोय जबरदस्त प्रतिसाद

-‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री पडली होती टीव्हीवर भावाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याच्या प्रेमात, १६ व्या वर्षी निभावले होते सूनेचे पात्र

-चित्रपटात बेड सीन देताना शाहरुखने केलं ‘असं’ काही, काजोलसह सर्वजण झाले होते चकित

हे देखील वाचा