बॉलिवूड अभिनेत्री लिसा हेडन ही नेहमीच चर्चेत असते. चित्रपटापासून दूर असली, तरीही सोशल मीडियावर ती मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. काही दिवसांपूर्वी तिने ती तिसऱ्यांदा आई होणार असल्याची बातमी चाहत्यांना दिली. या गर्भावस्थेत तिने पुन्हा एकदा बिकिनी घालून तिचे फोटोशूट केले आहे. तिच्या या फोटोमुळे ती सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहे. तसेच तिचे हे फोटो खूपच वेगाने व्हायरल होताना दिसत आहे.
या दिवसात लिसा तिचा पती डिनो लालवानी याच्यासोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. ती समुद्र किनारी तिच्या पतीसोबत एंजॉय करताना दिसते. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने लाल रंगाची बिकिनी घातली आहे. तसेच हॅट घातली आहे. तिने हे फोटो शेअर करत असे कॅप्शन लिहिले आहे की, “बीच बोल्ड 2021” दुसरा फोटो शेअर करून तिने लिहले आहे, “हा फोटो माझ्या पतीने काढला आहे.”
फेब्रुवारीमध्ये लिसाने तिच्या मुलासोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. यात तिने सांगितले होते की, ती मे महिन्यात आई होणार आहे. हा व्हिडिओ शेअर करत ती म्हणते की, “मी हा व्हिडिओ यासाठी बनवला आहे की, जेणेकरून मी लोकांपर्यंत पोहोचू शकेल. माझ्या आयुष्यात मागील काही दिवसात अनेक घटना घडल्या आहेत. पण माझ्या आळशीपणामुळे मी तुमच्याशी संवाद नाही साधला. यासाठी मी तुम्हा सगळ्यांची माफी मागते.” यानंतर ती तिच्या मुलाला विचारते की, आपल्या घरी कोण येणार आहे, त्यावर तो उत्तर देतो की, एक छोटीशी परी.
लिसा हेडन हिने ‘क्वीन’, ‘ये दिल है मुश्किल’, ‘आएशा’, ‘हाऊस फूल 3’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटातील तिच्या भूमिकेला खूप प्रेम मिळाले. लिसा ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक आहे. सोशल मीडियावर देखील तिचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. तिला इंस्टाग्रामवर 1.4 मिलियन फॉलोवर्स आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-आलियानंतर राम चरणचा ‘या’ चित्रपटातील लूक व्हायरल, मिळतोय जबरदस्त प्रतिसाद
-चित्रपटात बेड सीन देताना शाहरुखने केलं ‘असं’ काही, काजोलसह सर्वजण झाले होते चकित