Sunday, February 23, 2025
Home बॉलीवूड बहीण आरतीने खरेदी केली आलिशान जीप, भाऊ कृष्णा अभिषेकचे मन आले भरून; ‘असे’ केले अभिनंदन

बहीण आरतीने खरेदी केली आलिशान जीप, भाऊ कृष्णा अभिषेकचे मन आले भरून; ‘असे’ केले अभिनंदन

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आणि बिग बॉस फेम आरती सिंग हिने नुकतीच एक नवीन कार खरेदी केली आहे. आरतीच्या या कामगिरीवर तिचा भाऊ कृष्णा अभिषेकचे मन भरून आलेले दिसत आहे. त्याने बहिणीच्या या नवीन आलिशान जीपचा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करून त्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

त्याने व्हिडिओमध्ये असेही सांगितले आहे की, आरतीने स्वत: ही कार खरेदी केली आहे, आपल्या भावाकडून एक पैशाचीही मदत तिने घेतली नाही. त्याचवेळी, या व्हिडिओमध्ये आरती खूप आनंदी दिसत असून, ती भावावरचे प्रेम व्यक्त करतानाही दिसत आहे.

कृष्णाने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर आरतीच्या या नव्या आलिशान जीपचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो असे म्हणताना दिसत आहे की, “ही आरतीची नवी कार आहे, अभिनंदन! कसं वाटत आहे नवीन कार घेऊन?” यावर आरती म्हणते की, तिला खूप छान वाटत आहे. पुढे कृष्णा म्हणतो, “स्वत: च्या पैशाने, माझ्याकडून एक रुपयाही न घेता.” हे ऐकून आरती बोलते, “पण मी खूप भाग्यवान आहे की, माझा भाऊ नेहमी माझा लाड करतो.” कृष्णा विनोदपणे म्हणतो, “आता ही गाडी मी घेऊन जाईल शूटवर आणि तू स्विफ्टच चालव.”

हा व्हिडिओ शेअर करत कृष्णाने लिहिले, “नवीन कारसाठी तुझे अभिनंदन आहे आरती. तू माझ्याकडून पैसे न घेता स्वत: विकत घेतल्याबद्दल, मला किती आनंद होत आहे हे मी सांगू शकत नाही. ही एखाद्या भावासाठी अभिमानाची बाब आहे, देव तुला आशीर्वाद देवो. आरती याचप्रमाणे स्वत:वर अवलंबून रहा. चला आपल्याला आणखी एक गाडी मिळाली आहे. ही गाडी आता मी शूटवर नेईन.”

कृष्णाने नुकतेच माध्यमांना मुलाखत देत, ‘द कपिल शर्मा शो’ लवकरच सुरू होणार असल्याचे म्हटले होते. तो पुन्हा एकदा या शोमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-हरियाणवी गायिका रेणुका पवारच्या गाण्याने वाढवला यूट्यूबचा पारा, व्हिडिओत दिसतेय एकदम कडक

-श्रद्धा कपूरला पाहून मुलांनी म्हटले ‘होली है’, रंगाने भरलेले फुगे पाहून घाबरली अभिनेत्री, व्हिडिओ जोरदार व्हायरल

-हॉलिवूडमधील ‘द सुसाईड स्क्वॉड’ चित्रपटाचा ट्रेलर झाला रिलीझ, जॉन सीनाचा जबरदस्त अंदाज

हे देखील वाचा