Friday, October 18, 2024
Home अन्य अभिनयात नाहीतर ‘या’ क्षेत्रामध्ये सिंपल कपाड़ियाने केले होते करिअर, वाढत्या प्रसिद्धीमध्येच ठोकला जगाला राम राम

अभिनयात नाहीतर ‘या’ क्षेत्रामध्ये सिंपल कपाड़ियाने केले होते करिअर, वाढत्या प्रसिद्धीमध्येच ठोकला जगाला राम राम

प्रसिद्ध अभिनेत्री डिंपल कपाड़िया हिने आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. तिने अनेक गाजणाऱ्या चित्रपटामध्ये काम केले आहे. पण तुम्हाला माहिता आहे का? डिंपलची छोटी बहिण सिंपल कपाड़िया ही देखिल अभिनय क्षेत्राचा भाग होती. तिने देखिल अनेक चित्रपटामध्ये काम केले होते मात्र, तिला डिंपलसारखी प्रसिद्धी मिळाली नाही. त्यांमुळे तिने पडद्याआड काम करणे पसंत केले. तिच्या पुण्यतिथी निमित्त जाणून घेऊया काही रंजक गोष्टी.

अभिनेत्री सिंपल कपाडिया (Simple Kapadia) हिने अनेक चित्रपटामध्ये काम केले होते मात्र, हवी तशी प्रसिद्धी मिळाली नाही म्हणून अभिनेत्री इंडस्ट्रीपासून लांब झाली. यानंतर तिने कॉस्ट्युम डिझायनरमध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली. ती भले पडद्यावर झळकत न्हवती मात्र, पडद्याआड राहून तिने यशाचे शिखर गाठले होते, पण शरिराने तिला साथ दिली नाही आणि तिने 51 व्या वयातच अखेरचा श्वास् घेतला.

अबिनेत्री 15 ऑगस्ट 1958 साली जन्मलेल्या सिंपलने अगदी 18 वर्षाची असताना चित्रपटामध्ये पदार्पण केले होते. 1977 साली ‘अनुरोध’ या चित्रपटामध्ये आपला मेव्हना म्हणजेच दिग्गज अभिनेता राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांच्यासोबत पहिला चित्रपट केले होता. यानंतर तिने ‘शाका’, आणि ‘चक्रव्युह’ सारख्या चित्रपटामध्ये तिने मुख्या भूमिका केल्या असून ‘लूटमार’, ‘जमाने को दिखाना है’, ‘जीवन धारा’, ‘दूल्हा बिकता है’, सारख्या चित्रपटामध्ये अभिनेत्रीने साहाय्यक भूमिका निभावल्या होत्या.

simple kapadia 3

अभिनेत्रीला समजले की, अभिनयामध्ये तिला जास्त प्रसिद्धी मिळत नाही त्यामुळे तिने कॉस्ट्युम डिझायनरमध्ये करिअरला सुरुवात केली ज्यामध्ये तिला अमाप प्रसिद्धी मिळाली. तिने 1987 साली डिंपल कपाड़िया (Dimple Kapadia) हिचा ‘इंसाफ’ चित्रपटासाठी पहिला कॉस्ट्युम बनलवा होता यानंतर तिने ‘रुदाली’, ‘रोक सको तो रोक लो’, ‘शहीद’, सारख्या चित्रपटासाठी कॉस्ट्युम बनवले होते, रुदालीसाठी तिला नामांकन देखिल मिळालं. याशिवाय तिने अनेक दिग्गज अभिनेत्रीचे ड्रेस डिझाइन केले असून तिने यशाचे शिखर गाठले.

simple kapadiya 2

सतत असे होते की, जेव्हा आपण खूप यशस्वी होतो मात्र, नशीब आपली साथ देत नाही, असंच सिंपल सोबत घडले. तिने भले अभिनय क्षेत्रामध्ये प्रसिद्धी मिळवली नाही मात्र, एक कॉस्ट्युम डिझायनर बनून तिने इंडस्ट्रीमध्ये वेगळीच छाप सोडली. जेव्हा तिच्या करिअरमध्ये वाढ होत होती, तेव्हा तिला समजले की, ती कॅन्सरसारख्या भयानक आजाराला बळी पडली आहे, तेव्हा ती खूप तुटून गेली आणि तिने 10 नोव्हेंबर 2009 साली जगाला राम राम ठोकला.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कंगणा रणौतकडे पाहून जया बच्चनने फिरवली पाठ! सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल
रिया कपूनने ‘द क्रू’ चित्रपटाची केली घोषणा; करिना,तब्बू अन् क्रिती साकारणार प्रमुख भूमिका

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा