Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

मराठमोळी जोडी रितेश अन् जेनेलियाही रंगले होळीच्या रंगात, रोमँटिक व्हिडिओ शेअर करत दिल्या शुभेच्छा!!

देशभरात होळीचा सण अतिशय उत्साहात साजरा केला जात असून, बॉलिवूड कलाकारही रंगांनी रंगलेले दिसत आहेत. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांचे होळी खेळतानाचे फोटो समोर आले आहेत. बॉलिवूडची रोमँटिक जोडींपैकी एक रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुखदेखील होळीच्या रंगात रंगलेले दिसत आहेत. अलीकडेच रितेश आणि जेनेलियाने एक रोमँटिक व्हिडिओ शेअर करत, चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांचा हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

इंडस्ट्रीतील सर्वात गोंडस जोडप्यांपैकी एक रितेश आणि जेनेलियाचे रोमँटिक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर बर्‍याचदा व्हायरल होतात. रितेश आणि जेनेलियाचा असाच एक रोमँटिक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ते दोघेही रंगाने रंगलेले दिसत आहेत. त्याचवेळी, जेनेलिया रितेशवर फुले फेकत आहे.

व्हिडिओमध्ये असे दिसत आहे की, जेनेलिया प्रथम रंग फेकून रितेशला त्रास देत होती. त्यानंतर रितेश जेनेलियाच्या चेहर्‍यावर जबरदस्त रंग लावतो. व्हिडिओ शेअर करत जेनेलियाने लिहिले की, “कोविडचा प्रतिबंध लक्षात घेत, उत्सव स्वत:च्या मार्गाने खास बनवा. लहान आणि मर्यादित असले तरीही उत्सवाची भावना महत्त्वाची आहे. होळीच्या शुभेच्छा!”

आता जेनेलियाच्या या व्हिडिओला चाहते भरभरून प्रेम देत आहेत. रितेश आणि जेनेलियाने 2003 मध्ये ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाद्वारे एकत्र पदार्पण केले होते. तेव्हापासून दोघेही एकमेकांना डेट करू लागले. 2012 साली या दोघांचे लग्न झाले. रितेश आणि जेनेलियाला रियान आणि राहिल ही दोन मुले आहेत.

जेनेलिया सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते आणि बर्‍याचदा तिचे फोटोही शेअर करते. लग्नानंतर ती बर्‍याच दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहे. तथापि, जेनेलिया लवकरच चित्रपटांमध्ये पुनरागमन करू शकते. जेनेलियाच्या म्हणण्यानुसार, तिची मुले आता मोठी झाली आहेत आणि ती पुन्हा चित्रपटांमध्ये येऊ शकते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सारा अली खानचा होळीच्या शुभेच्छा देतानाचा व्हिडिओ व्हायरल, चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स

-सुशांतच्या गोड आठवणी! होळीदरम्यानचा थ्रोबॅक व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल

-श्रद्धा कपूरला पाहून मुलांनी म्हटले ‘होली है’, रंगाने भरलेले फुगे पाहून घाबरली अभिनेत्री, व्हिडिओ जोरदार व्हायरल

हे देखील वाचा