ऐंशीच्या दशकातील टॉप अभिनेत्रींपैकी एक नाव येते ते म्हणजे पद्मिनी कोल्हापुरे. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. बाकी अभिनेत्री सारखेच पद्मिनी यांनी देखील त्यांच्या करीअरमध्ये अनेक चित्रपटांना नकार दिला, हे चित्रपट पुढे जाऊन सुपरहिट बनले. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत त्यांनी त्या चित्रपटांबद्दल सांगितले आहे, ज्या चित्रपटांना त्यांनी नकार दिला, परंतु पुढे जाऊन ते चित्रपट सुपरहिट ठरले. ‘सिलसिला’ या चित्रपटात रेखाच्या भूमिकेसाठी आधी पद्मिनी यांना निवडले होते.
पद्मिनी यांनी एका मुलाखतीत सांगितले की, त्यांना ‘तोहफा’ चित्रपटात श्रीदेवीच्या पात्रासाठी तसेच ‘एक दुजे के लिये’ मध्ये रती अग्निहोत्री या पात्रासाठी निवडले होते. परंतु त्यांनी ते चित्रपट करण्यास नकार दिला.
यानंतर त्यांनी सांगितले की, त्यांना ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटाची ऑफर देखील आली होती. पण त्यांनी हा चित्रपट नाकारला पण पुढे जाऊन हा चित्रपट सुपरहिट बनला. या चित्रपटात मंदाकिनीने काही बोल्ड सिन दिले होते. त्यामुळे हा चित्रपट खूपच गाजला होता.
एका मुलाखतीत त्यांना विचारले गेले की, “तुम्हाला हा चित्रपट न केल्याचा कधी पश्चाताप झाला आहे का?” यावर त्यांनी उत्तर दिले की, “तुम्हाला आलेला प्रत्येक चित्रपट तुम्ही केलाच पाहिजे असं काही आहे का? आता जेव्हा राम तेरी गंगा मैली हा चित्रपट सुपरहिट झाला, तेव्हा तुम्हाला वाटते की या चित्रपटात काम करायला पाहिजे होतं.”
पद्मिनी कोल्हापुरे यांनी सांगितले की, या चित्रपटाची शूटिंग चालू झाल्यानंतरही राज कपूर त्यांना हा चित्रपट ऑफर करत होते. त्यांनी मला परत एकदा विचार करायला सांगितलं होतं, तेव्हा मंदाकिनी यांच्यासोबत 45 दिवसाची शूटिंग झाली होती.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-दिलजीतने शेअर केला मुलासोबतचा मजेशीर व्हिडिओ, सेलेब्सनी विचारले ‘आई कुठे आहे?’
-मराठमोळी जोडी रितेश अन् जेनेलियाही रंगले होळीच्या रंगात, रोमँटिक व्हिडिओ शेअर करत दिल्या शुभेच्छा!!
-इरफान खानच्या आठवणीत मुलगा बाबिल झाला भावुक; वडिलांचे कपडे परिधान करत दिला आठवणींना उजाळा