सध्या देशभरात लग्नसराईचा सीजन सुरू असताना चित्रपटसृष्टीही या बाबतीत मागे नाही. एकीकडे हंसिका मोटवानी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे, तर दुसरीकडे साऊथचा प्रसिद्ध स्टार नागा शौर्या यानेही लग्न केले आहे. आज 20 नोव्हेंबरला साऊथचा स्टार नागा शौर्याने त्याची गर्लफ्रेंड अनुषा शेट्टीसोबत बंगळुरूमध्ये सात फेरे घेतले आहेत. दोघांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
अभिनेता नागा शाैर्या (Naga Shaurya) आणि आणि त्याची गर्लफ्रेंड अनुषा शेट्टी (Anusha Shetty) हे बेंगळुरूमध्ये लग्नबंधनात अडकले. यावेळी दाम्पत्याच्या खास नातेवाईकांनी उपस्थित राहून या जोडप्याला शुभेच्छा दिल्या. नागा आणि अनुषा दोघीही पारंपारिक पोशाखात सुंदर दिसत हाेते. त्यांच्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या जोडप्याचे चाहते त्यांचे सतत अभिनंदन करत आहेत. त्याचबरोबर चित्रपटसृष्टीशी संबंधित लोकही त्यांना सतत शुभेच्छा देत आहेत.
Hero @IamNagashaurya and #AnushaShetty wedding celebrations ✨ pic.twitter.com/EAH9It03p2
— ???????????????????????????????????????????? (@UrsVamsiShekar) November 20, 2022
लग्नाच्या या खास दिवशी अनुषाने लाल रंगाची कांजीवरम साडी नेसली होती. नेकलेस, कानातले, नथ अशा पारंपरिक दागिन्यांमध्ये अनुषा खूपच आकर्षक दिसत होती. तर, नागाने पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि पारंपारिक धोतर परिधान केले होते. सिंपल लूकमध्ये नागा छान दिसत होता.
Congratulations to the adorable couple #NagaShaurya and #AnushaShetty.. Wishing you both all the happiness in the world. ????@IamNagashaurya #NagaShauryaWedsAnushaShetty #ShreyasMedia #ShreyasGroup pic.twitter.com/ZedWwgLCMp
— ???????????????????????????????????????????? (@UrsVamsiShekar) November 20, 2022
अलीकडेच, नागा शाैर्या चर्चेत आला हाेता. जेव्हा एका शूटिंगदरम्यान त्याची प्रकृती ठिक नसल्याने ताे बेहोश झाला हाेता. यानंतर अभिनेत्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. अभिनेता सेटवर हाय ग्रेड व्हायरल फिव्हर आणि डिहायड्रेशनमुळे बेशुद्ध पडला हाेता. ‘NH 24’ मधील भूमिकेसाठी तो स्ट्रिक्ट नॉन लिक्विड आहार घेत होता. त्यांना एशियन इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीमध्ये दाखल करण्यात आले हाेते. मात्र, काही दिवसांच्या उपचारानंतर तो पूर्णपणे बरा झाला आहे.(south actor naga shaurya tied knot with girlfriend anusha shetty photos viral on social media)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अर्रर्र! अवॉर्ड्स शाेमध्ये असे काय घडले की, रणवीरची आई लागली रडायला?
‘चंपक चाचा’ने व्हिडिओ शेअर करत दिले हेल्थ अपडेट, जाणून घ्या आता कशी आहे तब्येत?