बॉलिवूडमधील पावरफुल कुटुंबामधून आलेला अभनिते सनी देओल याने आपल्या करिअरमध्ये अनेक गाजणाऱ्या चित्रपटामध्ये काम केले आहे. 90 च्या दशकामध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांवर राज्य केले आहे. आजपर्यत अभिनेत्याचे सेटवर किंवा कोणत्या कलाकारासोबत वाद झाल्याचे समोर आले नाही. मात्र, सुनिल दर्शन यांनी सनीवर गंभीर आरोप केला आहे.
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सनी देओल (Sunny Deol) याच्यावर दिग्दर्शक सुनील दर्शन (Suneel Darshan) यांनी फसवणुकीचा आरोप केला आहे. त्यांच्या अशा आरोपामुळे अभिनेता खूपच चर्चेत आला आहे. हा वाद अनेक दिवसापासून सुरु झाला आहे. मात्र, सनी देओल याने अजून काहीच प्रतिक्रिया दिली नाही.
माध्यमातील वृत्तानुसार सुनिल दर्शन यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीदरम्यान 26 वर्षापूर्वी घडलेला प्रसंग सांगितला की, “त्यावेळी मी सनी अजय एकत्र काम करत होतो, तेव्हा चित्रपटाचा क्लायमॅक्स शुटिंग करण्यापूर्वीच सनी लंडनला निघून गेला. त्यामुळे मला चित्रपटाचा शेवट व्यस्थित करता आली नाही. मात्र, तरीही तो चालला, चित्रपट खूप हिट ठरला.”
View this post on Instagram
सुनिल दर्शन यांनी पुढे सांगितले की, “असे घडल्यानंतर सनी पुन्हा एकदा माझ्याकडे काम मागायला आणि त्याने मला एक संधी द्या असे सांगितले , तेव्हा मी त्याला माझ्या पुढील चित्रपटामध्ये घेतले. त्यासाठी त्याने सही करण्याचेही पैसे घेतले पण चित्रपटात कम करण्याला त्याने वेग वेगळ्या तारखा सांगून टाळले. शेवटी माझी सहनशक्ती संपली आणि मी त्याला पैसे परत मागितले. तेव्हा आमचे बोलने माजी सरन्यायधीश यांच्यासमोर झाले होते, तेव्हा सनीने सांगितले होते की, माझ्याकडे तुम्हाला द्यायला पैसे नाहीत, पण मी तुमचा चित्रपट करेल. मात्र, त्याने मला पुन्हा एकदा फसवले आणि माझा चित्रपट केलाच नाही. शेवटी मी पैसे परत मीगण्याची आशाच सोडली आणि दुसऱ्या अभिनेत्यासोबत मी चित्रपट पुर्ण केला.”
अशाप्रकारे सुनिल दर्शन यांनी सनी देओल बद्दल फसवणूकीचा आरोप करत 26 वर्षापूर्वीचा एक किस्सा सांगितला. मात्र, यावर सनी देओल याने अजून काहीच प्रतिक्रिया दिली नाही.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अंगावर शहारे आणणारा संजय मिश्रा, नीना गुप्ता यांच्या ‘वध’चा ट्रेलर; सिनेप्रेमींना आठवलं ‘श्रद्धा हत्याकांड
दिशा सालियनच्या मृत्यूबाबत मोठी बातमी, सीबीआयने सांगितले दिशाच्या मृत्यूचे कारण, वाचा…