बॉलिवूमधील ‘सत्या‘ चित्रपटाने प्रेक्षकांवर भुरळ घालणारा सुप्रसिद्ध अभिनेता मनोज वाजपेयी याने आपल्या दमदार अभिनयाने इंडसट्रीमध्ये वेगळेच स्थान निर्माण केले आहे. मनोजने आपल्या करिअरची सुरुवता चित्रपटातील छोट्यामोट्या भूमिकेतून केली होती. मात्र, ‘सत्या’ चित्रपटातील भूमिकेने त्याला रातोरात स्टार बनवले. आज त्याला कोणत्याही ओळखीची गरज नाही. नुकतंच अभिनेत्याने सोशल मीडिवर एक पोस्ट शेअर करत ‘मुंबईका किंग कौन?’ असा प्रश्न उच्चारल्यानंतर मनोजने दिलेल उत्तर चर्चेत आलं आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
अभिनेता मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) याने बॉलिवूडमध्ये सुरुवातीला चित्रपटामध्ये अनेक सहकारी भूमिका निभावल्या होत्या. मात्र, त्याला खरी ओळख ‘सत्या’ चित्रपटातून ‘भिकू म्हात्रे’ची भूमिका साकारल्यानंतर मिळाली. आजही चित्रपटातील अनेक डायलॉग आणि भिकू भूमिकेचे कौतुक केले जाते. ही भूमिका पुन्हा अलगडण्याचे कारण म्हणजे, मनोज पुन्हा एकदा आपल्या आगामी चित्रपटात या भूमिकेत पाहायला मिळणार आहे का? त्याने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकांउंटवरुन एक व्हिडिओ शेअर कॅप्शनमध्ये ‘भिकू इस बॅक’ असेही लिहिले आहे.
सत्या चित्रपटाचे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) यांच्यामुळे मनोज प्रेक्षकांच्या नजरेत आला आणि त्याच्या भमिकेने चाहत्यांवर भुरळ घातली. ‘मुंंबई का डॉन कौन’ हा प्रश्न ह्टिज म्युझिकनेदेखिल ट्वीटरवर विचारला होता. त्याचे उत्तर देत मनोजने ‘#BhikuMhatre’ असे सांगितले होते. सत्या चित्रपाटतील सर्वात खास आणि गाजलेला हा डायलॉग आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक चाहत्यांना प्रश्न पडला आहे की, अभिनेता सत्या 2 घेऊन यणार आहे का?
View this post on Instagram
मनोजने शेअर केलेल्या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे. त्याला ज्या भूमिकेने स्टार बनवलं तिच भूमिकी घेऊन तो पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मन जिंगण्यास येत आहे. एका युजर्सने कमेंट करत लिहिले की, ‘आता खूप मजा योणार, भारतीय चित्रपटात एक लक्षवेधी भूमिका करण्याची संधी पुन्हा एकदा आमच्या आवडत्या अभिनेत्याला’, तर दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘भिकू म्हात्रे आलाय तर त्याच अवतारात परत यायला पाहिजे.’
सत्या चित्रपटाने अनेक वर्ष राज्य केले असून आजही प्रेक्षक आवडीने हा चित्रपट पाहात असतात. चित्रपटातील गाणी आणि डायलॉग आजही तेवढेच प्रसिद्ध आहेत जेवढे 90 च्या दशकात प्रसिद्ध झाले होते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सुखी संसार मोडून गर्लफ्रेंडसोबत राहत होते ‘हे’ बॉलिवूड कलाकार, नावे पाहून तुम्हीही व्हाल थक्क
‘दृश्यम 2’ हिट होताच अजय देवगण पोहोचला काशी विश्वनाथला, पाहा व्हायरल फाेटाे