Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

ठरलं रे! कियार अन् सिद्धार्थ 2 डिसेंबरला अडकणार लग्न बंधनात?

बाॅलिवूडची लाेकप्रिय अभिनेत्री कियारा अडवाणी चित्रपटांसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी देखील चर्चेत असते. कियाराचे नाव बॉलिवूड लाेकप्रिय अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याच्यासोबत जोडले गेले आहे. दोघेही लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याचे दावाही केला जात आहे. दरम्यान, कियारा अडवाणीने एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने लवकरच एक मोठी घोषणा करणार असल्याचे सांगितले आहे. त्याचवेळी कियाराच्या या पोस्टनंतर पुन्हा एकदा तिच्या आणि सिद्धार्थच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे.

खरे तर, कियारा अडवाणी (kiara advani) हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये कियारा तिची स्टाईल दाखवत आहे. हा व्हिडिओ काही सेकंदांचा आहे, पण अभिनेत्रीची शैली पाहण्यासारखी आहे. या व्हिडीओसोबत कियाराने कॅप्शनमध्ये लिहिले की, “जास्त काळ गुप्त ठेवू नका! लवकरच येत आहे… सोबत रहा… 2 डिसेंबर.”

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

कियाराची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल हाेत आहे. कियारा लग्नाची घोषणा करणार असल्याचा अंदाज चाहते लावत आहेत. एक युजरने कमेंट करत म्हटलं की, “लग्नाचा मुद्दा असेल तर तो जुना झाला आहे.” तर, दुसऱ्या चाहत्याने लिहिले की, “तुझे आणि सिडचे लग्न झाले असेल तर दुसरे गुपीत सांगा.” अशा भिन्न-भिन्न कमेंट चाहते कियाराच्या इंस्टाग्राम अकाउंटवर करत आहेत.

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांची कॅप्टन बत्राच्या जीवनावर बनलेल्या ‘शेरशाह’ चित्रपटाच्या सेटवर मैत्री झाली होती. यानंतर दोघे रिलेशनशिपमध्ये आले. दोघेही बऱ्याच दिवसांपासून एकमेकाना डेट करत आहेत. त्यांच्या नात्याची चर्चाही साेशल मीडियावर रोज रंगत असते. तसेच दोघेही अनेकदा पार्ट्यांमध्ये एकत्र दिसतात. अशातच दोघेही आता रिलेशनशिप पुढे नेण्यासाठी तयार झाले असून लवकरच लग्न करणार असल्याचे माहिती येत आहे. ( bollywood actress kiara advani shared post for new announcement fans said its about wedding with sidharth malhotra)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अय्याे! अमिताभ बच्चन यांनी चक्क वडिलांना विचारला हाेता प्रश्न, ‘मला का जन्माला घातले?’

एवढा होता अमिताभ बच्चन यांचा पहिला पगार, वडिलांसाठी घेतलेली ‘ही’ वस्तू

हे देखील वाचा