होळीचा उत्सव सर्वत्र सुरूच आहे. मग काय गल्ली-बोळा, घर आणि चित्रपटाचा सेट, सर्व ठिकाणी लोक होळीच्या रंगात रंगलेले दिसतात. अलीकडे टीव्ही शो ‘कुछ तो है: नागिन एक नई रंग में’ च्या सेटवर होळीची झलक पाहायला मिळाली. वास्तविक, टीव्ही अभिनेत्री कृष्णा मुखर्जीने स्वत: चा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये शूटिंगचे काही क्षण टिपले गेले आहेत.
व्हिडिओ क्लिपच्या सुरूवातीला कोणीतरी कृष्णावर जग भरून पाणी ओतलेले पाहायला मिळाले. यामुळे सेटवर उपस्थित लोक तिच्याकडे पळत येतात. खरं तर ही होळीची मस्ती होती, ज्यामध्ये अभिनेत्रीसोबत बाकीचे कलाकारही सामील झाले.
टीव्ही मालिका ‘कुछ तो है: नागिन एक नई रंग में’ची मुख्य अभिनेत्री कृष्णा मुखर्जीने होळीच्या शुभेच्छा अगदी खास अंदाजात दिल्या आहेत. कृष्णाने ‘कुछ तो है’ या मालिकेच्या सेटवर काही दिवसांपूर्वी होळी खेळली होती आणि याचाच एक व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला. इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करत तिने चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
कृष्णाने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट टीम, ज्यांच्यासोबत मी काम केले आहे. सर्वांचे आभार आणि मी सर्वांना खूप मिस करत आहे. सर्वांसाठी खूप प्रेम. मला इतके प्रेम दिल्याबद्दल सर्वांचे आभार.” कृष्णा मुखर्जीचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूपच आवडला आहे आणि याला 2 लाखांहून अधिक लाईक्सही मिळाले आहेत. तसेच, आतापर्यंत 3 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.
कृष्णाला पाहून लोक बर्याचदा तिला मौनी रॉय समजू लागतात. सात वर्षांपूर्वी तिने चॅनेल व्ही च्या ‘झल्ली अंजली’ या मालिकेद्वारे अभिनेत्री म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली होती. ती आता 28 वर्षांची आहे. ‘नागीन 3’ मध्ये कृष्णाने तान्याची भूमिका साकारली होती. ती आता ‘कुछ तो है’ या नव्या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-दिलजीतने शेअर केला मुलासोबतचा मजेशीर व्हिडिओ, सेलेब्सनी विचारले ‘आई कुठे आहे?’
-मराठमोळी जोडी रितेश अन् जेनेलियाही रंगले होळीच्या रंगात, रोमँटिक व्हिडिओ शेअर करत दिल्या शुभेच्छा!!
-इरफान खानच्या आठवणीत मुलगा बाबिल झाला भावुक; वडिलांचे कपडे परिधान करत दिला आठवणींना उजाळा