‘बिग बॉस 14’चा उपविजेता राहुल वैद्य हा जेव्हापासून बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला आहे, तेव्हापासून त्याच्या लोकप्रियतेत प्रचंड प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत व्हायरल होत असतात. तो त्याची गर्लफ्रेंड दिशा पारमार हिच्या सोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्यांच्या फोटो आणि व्हिडिओला प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात पसंती देखील मिळत असते. नुकताच त्याचा एक फाईटचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तो फेमस टीव्ही स्टार अनिता हसनंदानी हिच्या पती सोबत भांडताना दिसत आहे. एवढंच काय तर त्यांची भांडण अगदी मारामारीवर गेली आहे. त्यांच्या या पूर्ण भांडणाचा व्हिडिओ रोहितने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे.
रोहितने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रोहित आणि राहुल एकमेकांसमोरून जात असतात, तेवढ्यात त्यांचा एकमेकांना धक्का लागतो. तेवढ्यात राहुल वळून येतो आणि रोहितला म्हणतो की, “अरे भावा कुठ बघतोय तू?” यावर रोहित रागाने म्हणतो की, “तू कुठ बघतोय मग?” यानंतर या कहाणीमध्ये ट्विस्ट येतो आणि कहाणी थोडी विनोदी होते.
यानंतर रोहित राहुलच्या टी शर्टचा कॉलर धरून त्याला वरती उचलतो. परंतु खरंतर अस काहीच झालेलं नसतं. उलट राहुल त्याच्या जागीच उभा असतो आणि रोहित खाली गुडघ्यावर बसलेला असतो. या व्हिडिओच्या सुरुवातीला असे वाटते की, त्यांचे खरेच खूप मोठे भांडण चालले आहे परंतु शेवट खूप विनोदी होताना दिसत आहे.
राहुल वैद्य हा बिग बॉस या शोमुळे घराघरात पोहोचला. त्याने हा शो जिंकला नाही पण प्रेक्षकांची मने जिंकायला तो अजिबात कमी नाही पडला. हा शो रूबीना दिलैकने आपल्या नावे केला. असे असले तरीही या शोमध्ये राहुुलला खूपच प्रेम मिळाले. तसेच सगळ्यांनी त्याला सपोर्ट देखील केला. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावर तो त्याच्या लव्ह लाईफमुळे खूपच चर्चेत आला. त्याची गर्लफ्रेंड दिशा पारमार हिच्या सोबत तो अनेक वेळा स्पॉट झाला आहे. तसेच ते दोघे लवकरच लग्न करणार आहे, अशी बातमी देखील आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘गब्बर’ धवनसोबत थिरकली युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा, भांगडा नृत्य करत वेधले नेटकऱ्यांचे लक्ष
-‘सगळं ठीक तर आहे ना?’ म्हणत सुष्मिताच्या भावनिक पोस्टवर चाहत्यांची प्रतिक्रिया










