बॉलीवूडचा प्रसिद्ध आणि लाेकप्रिय अभिनेता ऋतिक रोशन हा बी-टाऊनमधील सर्वात फिट आणि टॅलेंटेड अभिनेत्यापैकी एक आहे. त्याच्या लूकमुळे त्याला बॉलिवूडचा ग्रीक गॉड म्हटले जाते. ऋतिक अभिनयासोबतच किलर लुक्स, मजबूत शरीरयष्टी आणि उत्कृष्ट नृत्यासाठी देखील ओळखला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का, बालपणात ऋतिकला त्याच्या बॉडी इमेज आणि कॉन्फिडेंस इश्यू या समस्येचा सामना करावा लागला आहे. याचा खुलासा खुद्द ऋतिकने केला आहे.
ऋतिका (hrithik roshan) याने माध्यमाना दिलेल्या मुलाखतीत त्याच्या बालपणाबद्दल सांगितले. त्याने खुलासा केला की, “तो लहानपणी चेंगराचेंगरी करत असे, त्यामुळे त्याला शाळेत मारहाण केली जायची. त्या दिवसांत त्याला कोणी मित्रही नव्हते आणि मैत्रीणही नव्हत्या.”
View this post on Instagram
अभिनेत्याने पुढे सांगितले की, “तो शाळेतून घरी येतानाच रडायचा. ते दिवस ऋतिकसाठी खूप कठीण होते.” ताे पुढे म्हणाला की, “या प्राॅब्लेमला समाेर जाण्यासाठी ताे डॉक्टरांनकडे गेला आणि त्यावेळी डाॅक्टरांनी त्याला अभिनेता न होण्याचा सल्ला दिला. कारण, त्यांच्या पाठीच्या कण्यातील समस्येमुळे तो डान्स करू शकणार नाही असे डाॅक्टरांचे मत हाेते. हे ऐकल्यानंतर ऋतिक काहिदिवस डिप्रेशनमध्ये हाेता, पण शेवटी त्याने काम करून स्वत:ला बळकट केले आणि मानसिक व शारीरिक आरोग्यवर विजय मिळवला.
View this post on Instagram
ऋतिकच्या वर्कफ्रंटबद्दल बाेलायचे झाले, तर ताे अलीकडेच सैफ अली खानसोबत ‘विक्रम वेध’ या चित्रपटात दिसला हाेता. आता येत्या काही दिवसांत तो दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर यांच्यासोबत सिद्धार्थ आनंदच्या ‘फायटर’मध्ये दिसणार आहे. चित्रपटाचे शूटिंग सातत्याने सुरू आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. (bollywood actor hrithik roshan reveals he also suffered from physical and mental health issues)
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
मराठी अभिनेत्याची गंभीर आजाराशी झुंज, आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने मदतीसाठी शेअर केली पोस्ट
घटस्फाेटाच्या चर्चेवरून उर्मिला कोठारेचं माेठं वक्तव्य; म्हणाली, ‘ब्रेकअप झालं…’