भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित समजला जाणारा ५१ वा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ सुपरस्टार रजनीकांत यांना जाहीर झाला आहे. गुरुवारी (१ एप्रिल) केंद्रिय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली. आता हा पुरस्कार पुढील महिन्यात ३ मे रोजी रजनीकांत यांना देण्यात येणार आहे. त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अनेक क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
रजनीकांत यांनी १९७५ मध्ये ‘अपूर्व रागंगल’ या चित्रपटाने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. यानंतर, त्यांनी ‘अंधा कानून’, ‘इंसाफ कौन करेगा’, ‘कबाली’ आणि ‘शिवाजी द बॉस’ यांसारख्या अनेक शक्तिशाली चित्रपटांमध्ये महत्वाची भूमिका निभावली. महत्त्वाचे म्हणजे, १९८५ मध्ये सुपरस्टार रजनीकांतने १०० चित्रपट पूर्ण केले. ‘श्री राघवेंद्र’ हा रजनीकांत यांचा १०० वा चित्रपट होता आणि यात त्यांनी हिंदू संत राघवेंद्र स्वामी यांची भूमिका केली होती. रजनीकांत हा पुरस्कार स्वीकारणारे ५१ वे कलाकार आहेत. परंतु त्यांच्यापूर्वी कोणाला हा पुरस्कार मिळाला आहे याबद्दल आज आपण जाणून घेऊया.
भारत सरकारने १९६९ मध्ये ‘दादासाहेब फाळके’ पुरस्काराची स्थापना केली. दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारतीय सिनेमाचा सर्वोच्च आणि प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो. विशेष म्हणजे, देविका राणी चौधरी या पुरस्काराच्या प्रथम प्राप्तकर्ता होत्या.
दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवणारे कलाकार
१. १९६९- देविका राणी (हिंदी)
२. १९७०- विरेंद्रनाथ सरकार (बंगाली)
३. १९७१- पृथ्वीराज कपूर (हिंदी)
४. १९७२- पंकज मुळीक (हिंदी आणि बंगाली)
५. १९७३- रुबी मायर्स (हिंदी)
६. १९७४- बोम्मिरेड्डी नरसिम्हा रेड्डी (तेलुगु)
७. १९७५- धीरेंद्रनाथ गांगुली (बंगाली)
८. १९७६- कानन देवी (बंगाली)
९. १९७७- नितीन बोस (बंगाली आणि हिंदी)
१०. १९७८- रायचंद बोराल (बंगाली आणि हिंदी)
११. १९७९- सोहराब मोदी (हिंदी)
१२. १९८०- पैदी जयराज (हिंदी आणि तेलुगु)
१३. १९८१- नौशाद (हिंदी)
१४. १९८२- एल. व्ही. प्रसाद (हिंदी, तमिळ आणि तेलुगु)
१५. १९८३- दुर्गा खोटे (हिंदी आणि मराठी)
१६. १९८४- सत्यजित रे (बंगाली)
१७. १९८५- व्ही. शांताराम (हिंदी आणि मराठी)
१८. १९८६- बी. नागी रेड्डी (तेलुगु)
१९. १९८७- राज कपूर (हिंदी)
२०. १९८८- अशोक कुमार (हिंदी)
२१. १९८९- लता मंगेशकर (हिंदी आणि मराठी)
२२. १९९०- अक्किनेनी नागेश्वर राव (तेलुगु)
२३. १९९१- भालजी पेंढारकर (मराठी)
२४. १९९२- भूपेन हजारिका (आसामी)
२५. १९९३- मजरूह सुल्तानपुरी (हिंदी)
२६. १९९४- दिलीप कुमार (हिंदी)
२७. १९९५- राजकुमार (कन्नड)
२८. १९९६- शिवाजी गणेशन (तमिळ)
२९. १९९७- कवी प्रदीप (हिंदी)
३०. १९९८- बी. आर. चोप्रा (हिंदी)
३१. १९९९- ऋषिकेश मुखर्जी (हिंदी)
३२. २०००- आशा भोसले (हिंदी आणि मराठी)
३३. २००१- यश चोप्रा (हिंदी)
३४. २००२- देव आनंद (हिंदी)
३५. २००३- मृणाल सेन (हिंदी आणि बंगाली)
३६. २००४- अदूर गोपालकृष्णन (मल्याळम)
३७. २००५- शाम बेनेगल (हिंदी)
३८. २००६- तपन सिन्हा (हिंदी आणि बंगाली)
३९. २००७- मन्ना डे (हिंदी आणि बंगाली)
४०. २००८- व्ही. के. मूर्ती (हिंदी)
४१. २००९- डी. रामानायडू (तेलुगु)
४२. २०१०- के. बालचंदर (तमिळ आणि तेलुगु)
४३. २०११- सौमित्र चटर्जी (बंगाली)
४४. २०१२- प्राण (हिंदी)
४५. २०१३- गुलजार (हिंदी)
४६. २०१४- शशी कपूर (हिंदी)
४७. २०१५- मनोज कुमार (हिंदी)
४८. २०१६- के. विश्वनाथ (तेलुगु)
४९. २०१७- विनोद खन्ना (हिंदी)
५०. २०१८- अमिताभ बच्चन (हिंदी)
५१. २०१९- रजनीकांत (तमिळ)
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-चित्रपट बघताच ठरवले त्यांनी ध्येय आणि बनले भारताचे पहिले चित्रपट निर्माते; वाचा दादासाहेब फाळकेंचा संघर्षमय प्रवास