Friday, December 27, 2024
[aioseo_breadcrumbs]

नवीन ‘स्पायडर मॅन’ सिनेमात आपापसात भिडणार सुपरहिरो, ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला; सिनेमा कधी होणार रिलीज?

स्पायडर मॅन चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. स्पायडर मॅनचा ऍनिमेटेड सिनेमा ‘स्पायडर मॅन- ऍक्रॉस द स्पायडर व्हर्स’चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. ट्रेलरमध्ये सिनेमाचा मुख्य माईल्स मोरालेसचा प्रवास दाखवला आहे. याची सुरुवात माईल्स त्याची गर्लफ्रेंड ग्वेन स्टेसीला भेटल्यानंतर होते. ग्वेन ही माईल्सला स्पायडर व्हर्समध्ये घेऊन जाते. तिथे माईल्स त्याच्यासारख्याच अनेक लोकांना भेटतो. यामध्ये स्पायडर मॅनच्या वेगवेगळ्या ऍनिमेशन सीरिजपासून ते वेगवेगळे स्पायडर मॅनही सामील आहेत. यासोबतच ट्रेलरमध्ये स्पायडर वुमन आणि स्पायडर मंकीचीही झळक पाहायला मिळते. हा ट्रेलर चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

आपापसात भिडणार सुपरहिरो
‘स्पायडर मॅन- ऍक्रॉस द स्पायडर व्हर्स’ (Spider-Man Across the Spider-Verse) या सिनेमाच्या ट्रेलरची सुरुवात माईल्स मोरालेस (Miles Morales) त्याच्या आईशी बोलताना होते. त्याची आई त्याच्यासाठी चिंताग्रस्त असल्याचे दिसते. गर्लफ्रेंड ग्वेन स्टेसीला भेटल्यानंतर माईल्स स्पायडर व्हर्समध्ये जातो, तेव्हा वेगवेगळ्या जागांवरून आलेले अनेक स्पायडर मॅन आणि स्पायडर वुमनला तो भेटतो. ट्रेलरमध्ये भन्नाट ऍडव्हेंचर, ऍक्शन आणि फाईट पाहायला मिळते. कारण, माईल्स इतर स्पायडर मॅनशी येणाऱ्या धोक्याचा सामना कसा करणार यावरून बाचाबाची होते.

सिनेमात पीटर पार्करची एन्ट्री
ट्रेलरमध्ये माईल्स हे शोधण्याचा प्रयत्न करताना दिसतो की, सुपरहिरो असण्याचा खरा अर्थ काय असतो. लोकांची रक्षा करणे की, त्यांच्यावर हल्ला चढविणे. कारण, स्पायडर व्हर्सचे अनेक स्पायडर लोकांना मारू लागतात. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये स्पायडर मॅनचे भारतीय व्हर्जनही पाहिले जाऊ शकते. यावेळी सिनेमात पीटर पार्करचीही एन्ट्री झाली आहे, जो आतापर्यंत मार्व्हलच्या ऍव्हेंजर सीरिज आणि स्पायडर मॅन फ्रँचायझीमध्ये स्पायडर बनला आहे. ट्रेलरमध्ये भविष्यासाठी एका स्पायडर मॅनला प्रशिक्षण देतानाही दाखवले आहे.

कधी होणार रिलीज?
‘स्पायडर मॅन- ऍक्रॉस द स्पायडर व्हर्स’ या सिनेमाचे दिग्दर्शन डॉस सँटोस, केम्प पॉवर्स आणि जस्टीन के. थॉम्पन यांनी केले आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन 2 जून, 2023 रोजी हिंदी, तमिळ, तेलुगू  आणि इंग्रजी भाषेत रिलीज होईल. (miles morales is back spider man across the spider verse trailer released see here)

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
‘देवों के देव महादेव’ फेम पार्वतीने गुपचुप उरकला साखरपुडा, सोशल मीडियावर फोटो तुफान व्हायरल…
‘कांतारा 2’वर काम सुरू करण्यापूर्वी रिषभ शेट्टीने घेतले ‘या’ देवाचे दर्शन, परवानगीही मिळाली

हे देखील वाचा