Saturday, December 14, 2024
[aioseo_breadcrumbs]

आकांक्षा पुरी आणि मिका सिंगने केले लग्न? व्हिडिओ पाहून चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा

दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री आकांक्षा पुरी हिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत व्हायरल होताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ पाहून तिला सगळेजण शुभेच्छा देत आहेत. हा व्हिडिओ आकांशाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये ती प्रसिद्ध गायक मिका सिंग याच्यासोबत दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये मिका सिंगने पांढरा शर्ट घातला आहे, आणि आकांशाने लाल आणि राखाडी रंगाचा ड्रेस घातला आहे. हे दोघेही एका गुरुद्वारमध्ये बसून अरदास ऐकताना दिसत आहेत. मिका आणि आकांशाचा हा व्हिडिओ खूपच वेगाने व्हायरल होत आहे. त्यांच्या या व्हिडिओला बघून सगळेजण असा अंदाज लावत आहेत की, त्या दोघांनी लग्न केले आहे. आणि पाया पडण्यासाठी ते दोघे गुरुद्वारामध्ये गेले आहेत. अंदाज लावण्यामागचे कारण म्हणजे तिचे कॅप्शन.

हा व्हिडिओ शेअर करून आकांक्षाने सगळ्यांकडून शुभेच्छा मागितल्या आहेत. तसेच मिका सिंगला टॅग करून हार्टच्या ईमोजी पोस्ट केला आहे. तसेच अभिनेत्रीने त्या हॅशटॅगचा वापर केला आहे, ज्यावरून सगळे अंदाज लावू शकतात की, ते दोघे रिलेशनमध्ये आहेत किंवा त्यांनी लग्न केले आहे किंवा करणार आहे.

तिने लिहिले आहे की, #yearsoftogetherness #feelingblessed #togetherforlife #bond #life #beingme #akanshapuri. त्यांच्या रिलेशनबाबत अशा कोणत्याही बातम्या समोर आलेल्या नाहीत. परंतु चाहते मात्र त्यांना भरभरून शुभेच्छा देताना दिसत आहेत. मिकानेही आपल्या इंस्टाग्रामवरून गुरुद्वारामधील व्हिडिओ शेअर केले आहेत.

सन 2019 मध्ये बिग बॉस 13 मधून तिचे नाव पारस छाबडा याच्यामुळे चर्चेत आले होते. आकांक्षा पारसची एक्स गर्लफ्रेंड आहे. बिग बॉसच्या घरात असताना ते दोघे रिलेशनमध्ये होते पण बाहेर आल्यावर ते वेगळे झाले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-म्हणून सपनाला देसी क्वीन म्हणतात! अवघ्या काही दिवसांत सपनाच्या ‘या’ गाण्याला मिळालेत २ कोटी व्ह्यूज

-‘भेडिया’ चित्रपटाच्या सेटवर अभिनेत्री क्रिती सेननने धक्का दिल्यानंतर पाण्यात पडता पडता वाचला वरुण धवन, व्हिडिओ जोरदार व्हायरल

-मेगा स्टार चिरंजीवी आणि राम चरणच्या ‘आचार्य’ चित्रपटातील पहिले गाणे रिलीझ, अभिनेत्याच्या डान्स मुव्हजची होतेय प्रशंसा

हे देखील वाचा