इंडियन टेलिव्हिजनचा प्रसिद्ध रिऍलिटी शो ‘इंडियन आयडॉल‘ नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. या शोमध्ये स्पर्धकांच्या गोड आवाजासोबतच त्यांच्या आयुष्याशी संबंधित काही क्षणही शेअर केले जातात. सोनी टिवीवर प्रसारित होणाऱ्या या शोचा 13वा सीझनही प्रचंड गाजला आहे. कधी जजमुळे, तर कधी स्पर्धकांमुळे, या रिऍलिटी शोने टीआरपीच्या यादीत स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. प्रसिद्धीच्या झाेतात आलेला हा शो आता अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे. शोचा शेवटचा आठवडा काही दिवसातच प्रसारित होणार आहे, पण या फिनालेआधी शोचे निर्माते आणि जज यांना मोठा धक्का बसला आहे.
गेल्या शनिवारी (दि. 24 डिसेंबर)ला ‘इंडियन आयडॉल’च्या सेटवर असे काही घडले, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. खरं तर, इंडियन आयडॉल 13 च्या टॉप 10 स्पर्धकांमध्ये स्थान मिळवणाऱ्या सेंजुती दासने असे काही सांगितले की, ज्याने सर्वांनाच धक्का बसला. तिने अचानक शो सोडण्याचा निर्णय घेतला आहे. हे ऐकून विशाल ददलानीसह इतर सर्वजण थक्क झाले.
सेंजुतीने सांगितले की, “तिचे वडील आजारी आहेत आणि ती त्यांची देखभाल करु शकत नाही याची तिला खंत आहे.” सेंजुतीने जजला सांगितले की, “इंडियन आयडॉलमध्ये प्रवेश केल्यापासून मला खूप प्रेम मिळाले आहे. मला इतकी मोठी संधी मिळाल्याबद्दल मी देव आणि माझ्या आई-वडिलांचा खूप आभारी आहे, पण माझ्या आई-वडिलांसाठी असलेले माझे कर्तव्य मी पूर्ण करू शकत नाही, कारण मी इथे आहे. माझ्या वडिलांचा उपचार सुरू आहे. आजही ते कोलकात्याच्या रुग्णालयात आहे आणि माझ्या आईने त्यांना नेले आहे. त्यांच्या डाेळ्यांचा उपचार सुरू आहे. मला त्यांच्यासोबत असायला हवं होतं, माझी अनुपस्थिती मला खूप त्रास देत आहे.”
View this post on Instagram
सेंजुती पुढे म्हणाली की, “त्यांच्या घरात सर्व काही सामान्य नाही. या वर्षी तिच्या आक्काचे निधन झाले. तिची आई सर्व काही एकटी करते आणि तिला ते आवडत नाही. त्यामुळे तिला शो सोडायचा आहे.”
सेंजुतीच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. इंडियन आयडॉल 13 चे जज विशाल ददलानी यांनी सेंजुतीला तिच्या आई-वडिलांना मुंबईत आणण्यास सांगितले. विशाल ददलानी म्हणाले की, “इथपर्यंत येऊन मला सेंजुतीसारख्या स्पर्धकाला गमवायचे नाही. तिने आपल्या आई-वडिलांना मुंबईत येण्यास कन्विंस करावे. येथे त्यांची काळजी घेतली जाईल आणि सर्व व्यवस्था केली जाईल.(tv indian idol 13 contestant senjuti das wants to quit show before finale vishal dadlani and others get shocked )
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अजय देवगणच्या लेकीनं घातला डीप नेक ड्रेस; चाहते संतापत म्हणाले, ‘माय-बापानं जास्तच…’
कार्तिक आर्यनने ‘या’ अभिनेत्रीसोबत ख्रिसमस साजरा करताच चाहत्यांना पडले प्रश्न, म्हणाले…