Thursday, April 24, 2025
Home बॉलीवूड अर्रर्र! सलमानच्या वाढदिवशी त्याची एक झलक पाहण्यासाठी बेकाबू झाली गर्दी, पोलिसांनी केला लाठीचार्ज

अर्रर्र! सलमानच्या वाढदिवशी त्याची एक झलक पाहण्यासाठी बेकाबू झाली गर्दी, पोलिसांनी केला लाठीचार्ज

बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खान आज मंगळवारी ( दि. 27 डिसेंबर)ला त्याचा 57 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांसह त्यांचे मित्र आणि नातेवाईक त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसले. या दरम्यान, त्याचे चाहते सकाळपासून त्याच्या मेव्हण्याच्या घर गॅलेक्सी अपार्टमेंट्सच्या बाहेर त्यांची एक झलक पाहण्यासाठी थांबलेले हाेते. सलमाननेही आपल्या चाहत्यांना निराश न करता घराच्या बाल्कनीतून हात दाखवून त्यांचे स्वागत केले. दरम्यान, सलमानला पाहताच त्याचे चाहते अनियंत्रित झाले आणि त्यानंतर पोलिसांनाही चाहत्यांवर लाठीमार करावा लागला.

यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सलमान (salman khan) याची एक झलक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले चाहते व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याचबरोबर त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी बॅरिकेड्सही लावले हाेते. मात्र, यादरम्यान सलमानला पाहताच चाहत्यांनी गर्दी पुढे जाण्याचा प्रयत्न करू लागली आणि परीणामी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

तत्पूर्वी शाहरुख खानही दबंग खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या घरी पोहोचला होता. यादरम्यान दोघांनीही पॅपराझींसाठी एकत्र फोटोही क्लिक केले. विशेष म्हणजे, सध्या सलमान त्याच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याशिवाय तो शाहरुखच्या ‘पठाण’ या चित्रपटातही कॅमिओ करताना दिसणार आहे. माध्यमाातील वृत्तानुसार, सलमानच्या ‘टायगर 3’ मध्ये शाहरुख खान देखील कॅमिओ करताना दिसू शकताे.

सलमान खानच्या अभिनय काराकिर्दी विषयी बाेलायचे झाले, तर त्याने ‘हम आपके है काेण’, ‘हम साथ साथ है’, ‘कुछ कुछ हाेता है’, ‘दबंग’, ‘टायगर जिंदा है’, ‘बजरंगी बाईजान’, ‘बाॅडी गार्ड’ यासारखे दमदार चित्रपट बाॅलिवूडला दिले. (bollywood actor salman khan birthday police lathi charge on uncontrollable fans outside galaxy apartment)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘तुला रणवीर सिंग चावला की काय?’ सिद्धार्थ जाधवच्या नवीन स्टाईलची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

जरा इकडे पाहा! पॅपराझींनी रश्मिकावर केल्या अश्या काही कमेंट की, अभिनेत्री लाजून झाली लाल

हे देखील वाचा