Thursday, December 26, 2024
[aioseo_breadcrumbs]

मुकेश खन्ना यांनी तुनिषा शर्माच्या कुटुंबावर काढला राग; म्हणाले, ‘सर्वात मोठे दोषी मुलींचे…’

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येप्रकरणी एकामागून एक नवीन खुलासे होत आहेत. वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी या अभिनेत्रीने या जगाचा निरोप घेतला. तुनिषाच्या मृत्यूवर अनेक अभिनेते आणि अभिनेत्री आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. आता अभिनेता मुकेश खन्ना यांनीही तुनिषाच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. मुकेश यांनी इंडस्ट्रीतील मुलींच्या आत्महत्येवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

मुकेश खन्ना (mukesh khanna ) यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ते तुनिषाच्या आत्महत्येबद्दल बोलताना दिसत आहेत. मुकेश यांनी या प्रकरणी तुनिषाच्या आई-वडिलांवर प्रश्न उपस्थित केले आहे. तसंच तुनिषाच्या आत्महत्येला त्यांनी बालिशपणा म्हटलं आहे. मात्र, हे लव्ह जिहादचे प्रकरण असल्याचे मानण्यास नकार दिला. मुकेश खन्ना म्हणाले, “प्रत्येक खानने असे कृत्य केले पाहिजे असे नाही. या वयाच्या टप्प्यावर बालिश घटनांमुळेच हे घडत आहे. तुनिषा गेली आणि आता तिच्या बॉयफ्रेंडकडे बोट दाखवले जात आहे, पण यामागे काय आहे याबद्दल कोणीच बोलत नाही.”

अभिनेते पुढे म्हणाले, “सगळेच तुनिषाबद्दल आश्चर्यचकित झाले आहेत. मात्र, सर्वात मोठे दोषी मुलींचे पालक आहेत. मुलं स्वत:ला सांभाळून घेतात. मात्र, मुली भावनिक आणि संवेदनशील असतात. तो धागा तुटला की, मुली आपले जीवन संपवतात. ज्या मुली आपल्या प्रियकराला आपला देव मानतात, आपले सर्वस्व मानतात, जेव्हा त्यांना समोरची व्यक्तीकडून फसवणूक झाल्याचे कळते, तेव्हा त्यांच्या मनावर काय होत असेल? तुनिषाचे मन दु:खी झाले आणि तिने जीवघेणा निर्णय घेतला. पालकांनी मुलांना एकटे सोडू नये, अन्यथा प्रत्येक मुलाची अवस्था अशी होईल.”

मुकेश खन्ना आपला मुद्दा पुढे करत म्हणाले की, “आत्महत्येच्यावेळी मित्र किंवा पालक हजर असते तर तुनिषा मरण पावली नसती. प्रत्येक पालकांनी आपल्या मुलींना मायानगरीत एकटे सोडू नये. त्यांनी आपल्या मुलांना भेटून त्यांच्या हिताची विचारपूस करावी.”

मुकेश यांनी टीव्ही इंडस्ट्रीलाही मालिकांमध्ये आत्महत्यांना अतिशयोक्तीने न दाखवण्याची विनंती केली.(tv actress tunisha sharma suicide actor mukesh khanna blames actress parents for her death refused to love jihad case angle)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘तुला रणवीर सिंग चावला की काय?’ सिद्धार्थ जाधवच्या नवीन स्टाईलची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

धक्कादायक! सेटवरच ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची तब्येत ढासाळली, नाकातून रक्तस्त्राव अन्…

हे देखील वाचा