Friday, December 27, 2024
[aioseo_breadcrumbs]

धनश्री वर्मा आणि क्रिकेटर युझवेंद्र चहल यांची ‘वेडिंग फिल्म’ झाली रिलीझ; काही तासांतच मिळाले लाखो हिट्स

धनश्री वर्मा आणि भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहल यांच्या चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. या जोडप्याने त्यांच्या लग्नाचा व्हिडिओ रिलीझ केला आहे. दोघांनीही इंस्टाग्रामवर पोस्टच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. धनश्री वर्माने त्यांच्या लग्नाचा संपूर्ण व्हिडिओ तिच्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये, त्यांच्या लग्नातील सर्व विधी, मजा-मस्ती, नातेवाईकांसोबतचा डान्स आणि सर्व काही दाखवण्यात आले आहे. व्हिडिओच्या एका क्लिपमध्ये धनश्री हातात एक बॉल घेऊनही दिसली आहे.

धनश्री वर्मा आणि युझवेंद्र चहल यांच्या लग्नाचा हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो वेळा पाहिला गेला आहे. धनश्री आणि चहलचा रोमँटिक डान्स परफॉरमन्सदेखील या व्हिडिओमध्ये दिसत आहे. चाहत्यांच्या मागणीवरुन दोघांनी त्यांची ही ‘वेडिंग फिल्म’ रिलीझ केली आहे. युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचे मागच्या वर्षी 22 डिसेंबर रोजी लग्न झाले होते. या दोघांच्या लग्नाचे बरेच फोटो त्यावेळी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

धनश्री वर्मा काही दिवसांपूर्वी ‘ओये होये होये’ या गाण्यात दिसली होती. गाण्यातील धनश्री वर्मा आणि जस्सी गिलची केमिस्ट्री अगदी पाहण्यासारखी आहे. धनश्री व्यवसायाने एक डॉक्टर आहे, पण डान्सच्या माध्यमातून तिने तिची जबरदस्त ओळख निर्माण करण्यात कसलीही कसर सोडली नाही. तिच्या इंस्टाग्राम फॉलोअर्सची संख्या 34 लाखाहून अधिक आहे, तर यूट्यूबवर तिच्या सबस्क्रायबर्सची संख्याही जवळपास 20 लाखांच्या पल्याड गेली आहे.

नुकताच धनश्रीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये ती क्रिकेटर शिखर धवनसोबत जबरदस्त स्टाईलमध्ये भांगडा करताना दिसली. हा व्हिडिओ पाहून चाहत्यांकडून तिचे खूप कौतुकही झाले होते. इतकेच नव्हे, तर यापूर्वीही ती क्रिकेटर श्रेयस अय्यरसोबत नाचताना दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-फिटनेस असावा तर असा! अभिनेत्री कॅटरिना कैफने शेअर केला अवघड वर्कआऊट व्हिडिओ, पाहून तुम्हालाही फुटेल घाम

-बॉलिवूड अभिनेता संजय कपूरच्या मुलीने शेअर केला बेली डान्स व्हिडिओ, पाहा झक्कास ठुमके

-तब्बल ७ कोटी रुपयांच्या गाडीत बसण्यापूर्वी ‘सिंघम’ अजय देवगणने फोटोग्राफरला दिला मोलाचा सल्ला, म्हणाला…

हे देखील वाचा