2022 साली लग्न बंधनात अडकणाऱ्या बॉलिवूड स्टारची बरीच चर्चा झाली. आता येणारे वर्ष 2023 चित्रपटसृष्टीतील अनेक स्टार्सना एकत्र करणार आहे. म्हणजेच आगामी वर्षात तुमचे आवडते स्टार्स लग्न बंधनात अडकणार आहेत. तर मंडळी आज आम्ही तुम्हाला त्या सर्व अभिनेत्री आणि अभिनेत्यांबद्दल सांगणार आहोत जे बऱ्याच दिवसांनपासून रिलेशनशिपमध्ये आहेत आणि 2023 मध्ये लग्न करणार आहेत.
कियारा अडवाणी – सिद्धार्थ मल्होत्रा
बॉलिवूडची लाेकप्रिय अभिनेत्री कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहे. दोघेही लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, आता 2022 हे वर्ष संपण्याच्या मार्गावर आहे. मात्र, पुढच्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये कियारा-सिद्धार्थ लग्न करू शकतात. दोघांच्या लग्नाची तारीख अद्याप समोर आलेली नाही. यासाेबतच कियारा आणि सिद्धार्थ यांनीही लग्नाबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही.
अथिया शेट्टी – केएल राहुल
सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांच्या लव्हस्टोरीची 2022 साली खूप चर्चा झाली होती. काही दिवसांपासून दोघांच्या लग्नाच्या बातम्या जोरात आहेत. माध्यमातील वृत्तानुसार, दोघेही वर्ष 2023 च्या पहिल्या महिन्यात म्हणजेच जानेवारीमध्ये लग्न करणार आहेत. अथिया आणि केएल राहुल भारतीय रितीरिवाजानुसार लग्न करणार आहेत. 21 ते 23 जानेवारी दरम्यान दोघांचे लग्न होण्याची शक्यता आहे.
मलायका अराेरा – अर्जुन कपूर
मलायका आणि अर्जुनने बऱ्याच काळ एकमेकांना गुपचूप डेट केले, पण या वर्षी दोघांनी आपल्या प्रेमाची कबुली देण्यास अजिबात संकोच केला नाही. ‘मुव्हिंग विथ मलायका’ या शोमध्ये अभिनेत्रीने अर्जुनसोबतच्या तिच्या नात्याबद्दलही सांगितले. हे दोघे कधी लग्नबंधनात अडकणार हे सर्वांनाच जाणून घ्यायचे आहे. मात्र, अद्याप दोघांनी लग्नाच्या तारखेची काेणतेही माहिती शेअर केलेली नाही.
कुल प्रीत सिंग – जॅकी भगानी
साऊथ अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगानी यांच्या नात्याने सर्वांनाच आश्चर्यचकित केले. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर लोकांमध्ये दोघांच्या लग्नाबद्दल प्रश्न उपस्थित होऊ लागले. पुढच्या वर्षी म्हणजेच 2023मध्ये हे जोडपे लग्न बंधनात अडकणार आहे.
इरा खान – नुपूर शिखरे
आमिर खानची मुलगी इरा खान हिचा नुपूर शिखरेसोबत साखरपुडा झाला आहे. हा आनंद सेलिब्रेट करण्यासाठी मुंबईत एका खास पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टित आमिरही आनंदाने फुलताना दिसला. पुढच्या वर्षी म्हणजेच 2023मध्ये एका चांगल्या मुहूर्तावर हे लव्ह बर्ड्स लग्न बंधनात अडकणार असल्याच्या बातम्या आहेत. इराच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. (bollywood stars marriage in 2023 from kiara sidharth to ira khan nupur sihkhare)
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘हा’ आहे सिद्धार्थ मल्होत्राचा फिट राहण्याचा फंडा, व्हिडिओ शेअर करून दिल्या टीप्स
एक्स गर्लफ्रेंड आलियाची ‘ही’ गोष्ट आजही मिस करतो सिद्धार्थ; ऐकून रणबीरचाही चढेल पारा