नुकतेच आपण सर्वानी नवीन वर्षाचे दणक्यात स्वागत केले. प्रत्येक जणं नवीन वर्ष सुरु होणार या निमित्ताने काहीतरी नवीन संकल्प करतो आणि त्या येणाऱ्या नवीन वर्षात केलेला संकल्प पूर्ण करायचा प्रयत्न केला जातो. असे नवीन वर्षात संकल्प फक्त सामान्य लोकंच करतात असे नाही तर कलाकार देखील विविध संकल्प करून ते पूर्ण करतात. आता यात मराठी इंडस्ट्रीमधील कलाकार कसे मागे राहतील मराठी सिनेसृष्टीला आघाडीचा अभिनेता असलेल्या उमेश कामतने देखील असाच एक संकल्प केला असून, याबद्दल त्याने सोशल मीडियावर माहिती देखील दिली आहे.
मराठी सिनेविश्वातील चॉकलेट बॉय आणि क्युट चेहरा असलेला दमदार अभिनेता अशी उमेशची ओळख आहे. सध्या उमेशने नवीन वर्षाच्या निमित्ताने घेतलेला संकल्प चांगलाच गाजत आहे. उमेशने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून त्याचा आणि बायको प्रियाचा फोटो पोस्ट करत ‘यावर्षी मी जास्तीत जास्त वेळ या क्युटी सोबत घालवणार’ असे लिहिले आहे.
View this post on Instagram
उमेश कामत आणि प्रिया बापट यांची जोडी आणि त्यांच्यात असलेली केमेस्ट्री प्रेक्षकांना तुफान आवडते, या दोघांचे अमाप चाहते आहेत. आपल्या चाहत्यांच्या संपर्कात हे दोघं सतत असतात आणि त्यांच्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्याशी निगडित सर्वच अपडेट त्यांना देत असतात. प्रिया आणि उमेश या जोडीला ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन एकत्र बघणे म्हणजे चाहत्यांना एक पर्वणीच असते. आता उमेशने केलेला हा नवीन वर्षाचा संकल्प सर्वांनाच खूप आवडला आहे. अनेकांनी त्याच्या या पोस्टवर ‘रोमँटिक’ म्हणत उत्तर दिले आहे.
उमेश आणि प्रिया सतत काहींना काही वेगळे करत आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करत असतात. या जोडीचा सध्या सर्वत्र चांगलाच बोलबाला आहे. लग्नाच्या ११ वर्षांनंतरही त्यांच्या असलेले प्रेम सर्वांनाच आकर्षक करत असते. अनेकांना त्यांचा हेवा वाटल्याशिवाय राहत नाही.
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘पेहराव नंगटपणा असेल तर मग अमृता फडणवीसला …’, सुषमाताई अंधारेंचा चित्रा वाघ यांना खोचक सवाल
…आशीर्वाद देणारे आहेत “पंत” प्रसाद ओकच्या नव्या सिनेमाची घोषणा, साकारणार ही मोठी भूमिका