बॉलिवूडमधील प्रसिद्ध सिगंर आणि रॅपर हनी सिंग ही सतत कोणत्याना कोणत्या कारणासाठी सतत चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी त्याने त्याची नवीन ग्रलफ्रेंड टीना थडानी हिच्यासोबत नात्याची माहिती दिल्यानंतर हनीने सगळ्यांचेच लक्ष वेधले होते. पुन्हा एकदा हनी त्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. सर्वत्र उर्फीच्या नावाचा गाजावाजा पाहायला मिळत आहे राजकारणी नेत्यांनी तिला चांगलच प्रसिद्ध केलं आहे. कही दिवसांपासून चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यामध्ये सोशल मीडिया वॉर पाहायला मिळत आहे. चित्रा वाघ यांनी उर्फीवर नंगानाच आणि नुयडीटी पसरवण्याचा आरोप करत तिला अटक कारावी अशी मागणी केली आहे. मात्र, उर्फीने देखिल त्यांना सडेतोड अत्तरे दिले आहेत. त्याशिवाय यांच्या वादामध्ये अनेकांनी उड्या घेतल्या असून हनी सिंगने देखिल उर्फीबद्दल वक्तव्य केलं आहे.
आपल्या दमदार आवाजासाठी ओळखला जाणारा रॅपर आणि सिंगर यो यो हनी सिंग (Yo Yo Honey Singh) याने नुकतंच उर्फीच्या वादामध्ये उडी घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यामध्ये सोशल मीडिया वॉर बघायला मिळत आहे. “असा नांगनाच आम्ही महाराष्ट्रात चालू देणार नाही. मला जर ती कुठे भेटली तर मी तिला थोबडवून काढेन.” असा इशारा चित्रा वाघ यांनी उर्फीला दिली होता. मात्र, यानंतर या वादाने चांगलाच पेट घेतला असून अनेकांनी यामध्ये सहभाग घेतला होता. अशातच हनी सिंगने देखिल उर्फीचं कौतुक केलं आहे. (Honey singh speaks about Urfi javed)
नुकत्याच दिलेल्या मुलाखतीदरम्यान हनी सिंगने उर्फीचे कौतुक केले असून तो तिच्यासोबत लवकरच कामही करणार आहे. त्याने सांगितले की, “मला ही मुलगी प्रचंड आवडते. ती प्रचंड बोल्ड आणि धाडसी आहे. स्वतःचं आयुष्य ती स्वतःच्या अटींवर जगते. देशातील सगळ्या मुलींनी तिच्याकडून काहीतरी शिकायला हवं.” उर्फी जावेदसोबत भविष्यात काम करण्याबद्दल हनीने सांगितेल की, “नक्कीच जर मला एखादं गाणं मिळालं ज्यामध्ये ती उत्तम काम करू शकेल मी नक्कीच तिच्याबरोबर काम करेन. माझ्याकडून तिला भरपूर शुभेच्छा आणि पाठिंबा.”
View this post on Instagram
हनीच्या अशा वक्तव्यानंतर त्याला जाम ट्रोल केलं जात आहे. त्याशिवाय त्याने तोंडभरुन उर्फीचं कौतकही केलं आहे. हनीचं हे वक्तव्य त्याच्या चाहत्यांना फार काही आवडलं नाही त्यामुळे अनेकांनी त्याला निशाण्यावर धरले आहे. हनीच्या अशा वक्तव्यानंतर सोशल मीडियावर खळबळ माजली आहे. (Of course, if I get a song that she can do well in, I will definitely work with her. My best wishes and support to her)
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
टीनाने हनी सिंगसोबतच्या तिच्या नात्याबद्दल केली पुष्टी, ट्रोलर्सला दिले चोख प्रतिउत्तर
साऊथचा सुपरस्टार विजय थलापति घेणार घटस्फोट? वाचा व्हायरल झालेल्या बातमीचे सत्य