बॉलिवूडमधील लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्री असलेली बिपाशा बसू आज (७ जानेवारी) रोजी तिचा ४४ वा वाढदिवस साजरा करत आहे. बिपाशासाठी हा वाढदिवस नक्कीच खास असणार आहे. कारण यावर्षी तिची मुलगी देखील तिच्यासोबत आहे. हो दोन महिन्यांपूर्वी बिपाशाने एका मुलाला जन्म दिला. आज बिपाशाने तिच्या वाढदिवसाचे निमित्त साधत तिचा तिच्या मुलीसोबतचा एक क्युट व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने स्वतःला सर्वात भाग्यवान म्हटले आहे.
View this post on Instagram
बिपाशाने २२ नोव्हेंबर रोजी लग्नाच्या सहा वर्षांनी एका मुलीला जन्म दिला. त्यामुळे हा वाढदिवस बिपाशाने खास अंदाजमध्ये आजरा करण्याचे ठरवले आहे. बिपाशाने जो व्हिडिओ शेअर केला आहे, त्यात ती तिच्या मुलीच्या पायाला किस करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. बिपाशाने अजूनपर्यंत तिच्या मुलीचा चेहरा दाखवला नाही. या व्हिडिओमध्ये देखील तिच्या मुलीचा चेहरा समोर आलेला नाही. हा व्हिडिओ शेअर करताना तिने लिहिले, “देवाने मला माझ्या मुलीच्या देवीच्या रूपात मला सर्वात सुंदर भेट दिली आहे. माझ्या सर्वात पहिल्या छान भेटीनंतर. माझ्या आयुष्यातील प्रेम, माझा नवरा करण सिंग ग्रोव्हर…मी जगातील सर्वात भाग्यशाली मुलगी.” असे लिहिले असून सोबतच ‘न्यू मॉमी’, ‘इट्स माय बर्थडे’ असे हॅशटॅग देखील वापरले आहेत.
बिपाशा बासूच्या या पोस्टवर तिच्या फॅन्ससोबतच बॉलिवूडमधील मलायका अरोरा, शमिता शेट्टी, अयाज खा, सोफी चौधरी आधी अनेक कलाकारांनी कमेंट्स केल्या आहे. यासोबतच तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत. तत्पूर्वी बिपाशाने ऑगस्ट महिन्यात तिचे बेबी बंप फ्लॉन्ट करत ती आई होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर तिचे बेबी शॉवरचे, फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दिलजीत दोसांझ आहे दहावी पास, कंगना रणौतसोबत झालेल्या वादामुळे आला होता चर्चेत
उर्फी जावेदच्या कपड्यांवरून वाद काही थांबेना, आता थेट महिला आयाेगाकडून चित्रा वाघ यांना नाेटीस