यूट्यूब जताचा बादशाह म्हटल्या जाणार्या भुवन बामने ओटीटीवर धमाकेदार एन्ट्री करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. युट्युबवर भुवन बामच्या कॉमेडीबद्दल सगळ्यांनाच माहिती होती, पण ‘ताजा खबर‘ या वेबसिरीजमधील त्याच्या अभिनयाला पण चाहत्यांनी खूप प्रतिसाद दिला. हॉटस्टारवर प्रदर्शित झालेल्या ‘ताजा खबर’मधील भुवन बमच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. आता अभिनयाच्या दुनियेत प्रवेश केला असला तरी ‘बीबी की वाइन्स‘मुळे तो जगभर प्रसिद्ध आहे.
भुवन बामची कारकीर्द:
भुवन बाम याचे खरे नाव ‘भुवन अवनींद्र शंकर बाम’ आहे. कॉमेडियन असण्यासोबतच तो लेखक, गायक, गीतकार देखील आहे. यूट्यूबवर व्हिडिओ टाकण्यापूर्वी तो गाणी गाऊन पैसे कमवत असे. यानंतर भुवन बामने यूट्यूबवर ‘बीबी की वाइन्स’ सुरू केले आणि त्याचे व्हिडिओ जगभरात व्हायरल झाले. त्याच्या ‘टीटू टॉक्स’ आणि ‘धिंडोरा’ या डिजिटल मालिकाही खूप गाजल्या. त्यानी ‘तेरी मेरी कहानी’, ‘संग हूँ तेरे’, ‘सफर’ आणि ‘अजनबी’ यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.
भुवन बाम नेट वर्थ:
तो यूट्यूब व्हिडिओ आणि जाहिरातींच्या माध्यमातून करोडो रुपये कमावतो. माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत खुद्द भुवन बामने यूट्यूबच्या माध्यमातून करोडो कमावल्याचा खुलासा केला. ‘बीबी की वाइन्स’चे जवळपास 25.7 मिलियन सब्सक्राइबर्स आहेत. त्याची एकूण संपत्ती सुमारे 30 कोटी रुपये आहे. तो एका वर्षात 4 कोटी रुपयांपर्यंत कमावतो. त्याचे मासिक उत्पन्न सुमारे 25 लाख रुपये असल्याचे सांगितले जाते.
सध्या भुवन बाम हा ‘ताजा खबर’ या वेबसिरीजमुळे चर्चेत आहे. ही वेब सिरीज ‘हॉटस्टार’वर रिलीज झाली आहे. भुवनसोबत श्रिया पिळगावकर, नित्या माथूर, देवन भोजानी असे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
अपघातानंतर अवघ्या 12 तासातच रोहित शेट्टी परतला सेटवर, सिद्धार्थने कौतुक करत शेअर व्हिडिओ केला
पॅपराजी फोटो काढायला येताच रिक्षाचालकावर भडकली ट्विंकल खन्ना, व्हिडिओत कैद झाली रिऍक्शन