Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

अमिताभ बच्चन यांना ट्वीटरवर ‘ही’ चूक पडली महागात, माफी मागूनही…

बॉलिवूड सिनेसृष्टीमधील मेगास्टार दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन चित्रपटांसोबतच सोशल मीडियावर खुप सक्रिय असतात. आपल्या भावना असो किंवा नवनवीन फोटो शेअर करत आपल्या चाहंत्यांशी जोडले असतात. मात्र, अभिनेत्याकडून पोस्ट शेअर करत असताना एक चूक झाली होती, ज्याची माफी मागण्यासाठी अमिताभाजींनी पोस्ट शेअर केली आहे. पण क्षमा मागण्याच्या पोस्टवरही काही नेटकऱ्यांनी त्यांना गंमतीदार कमेंट करत ट्रोल केलं आहे.

अमिताभा बच्चन (Amitabh Bacchan) यांना अभिनयाक्षेत्राचा इतिहास मानले जाते. त्यांच्या अभिनयाचे आणि स्टाइलचे तर तरुन पिढी देखिल फॅन आहे. त्यांनी ट्वीटर अकाउंटवर पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये काही चूक झाली होती. त्यांच्यासाठी बीग बींनी पोस्ट शेअर करुन माफी मागितली आहे आणि पस्ट शेअर करत लिहिले की, “T4515 मोठी चूक, T 4514 नंतर माझे पूर्वीचे सर्व ट्विट चुकले आहेत. T 5424,5425,5426,4527, 5428, 5429, 5430.. सर्व चुकीचे आहेत.. ते T4515,4516,4517,4518,4519 4520,452 असायला हवे होते. क्षमा.” असं ट्वीटमध्ये सांगितलं आहे.

अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेल्या पोस्टवर एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिले की, ‘सर स्पष्टीकरणासाठी धन्यवाद.’ दुसऱ्याने लिहिले की, ‘सर हे दाखवल्याबद्दल धन्यवाद.’ अजून एकाने लिहिले की, मला झोप येत नव्हती.’ त्याशिवाय एका युजरने लिहिले की, “सर माफीचे स्पेलिंग चुकीचे आहे, कृपया T4516 मध्ये ते दुरुस्त करा.” अशा गंमतीदार कमेंट करुन नेटकरी अमिताभजींना ट्रोल करत आहेत.

अमिताभ बच्चन यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलयाचे झाले, तर त्यांनी नुकतंच ‘ऊंचाई’ आणि ‘गुडबाय’ चित्रपटामध्ये काम केलं आहे. मात्र, हे चित्रपट बॉक्सऑफिसवर फार काही कमाल करु शकले नाही. त्याशिवाय त्यांनी ब्लॉकबस्टर ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातहा काम केलं आहे. त्याशिवाय अभिनेता दीपिका पदुकोण (Deepika Padukone) सोबत ‘प्रोजेक्ट के’मध्येही दिसणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-

सिद्धार्थ आणि कियारा यांच्या लग्नावर ‘या’ तिसऱ्याच व्यक्तीने केले शिक्कामोर्तब?, व्हिडिओ वायरल
अशोक सराफ यांच्या विषयी खंत व्यक्त करत; राज ठाकरे म्हणाले, ‘त्यांना विनोदी अभिनेता म्हणणंच चुकीचं…’

हे देखील वाचा