सामान्य लोकांना नेहमीच कलाकारांच्या आयुष्याचा हेवा वाटत असतो. पैसा, ग्लॅमर, नाव सर्वच असल्यामुळे असे वाटणे स्वाभाविक आहे. मात्र कलाकरांना देखील अनेक मोठ्या समस्यांना सामोरे जावे. मात्र जगासमोर वावरताना त्यांना आनंदाचा मुखवटा खालून फिरावे लागते. अशीच एक टेलिव्हिजन अभिनेत्री असलेली अभिनेत्री म्हणजे छवी मित्तल. मागच्यावर्षी छवीला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे निदान झाले. त्यानंतर तिची सर्जरी झाली. आता तिचा सर्जरीनंतरचा फॉलोअप रिपोर्ट आला आहे.
View this post on Instagram
छवीने तिचा रिपोर्ट काय आला हे सांगत एक पोस्ट शेअर केली आहे. तिने स्वतःचा एक फोटो पोस्ट करत लिहिले, “स्वतःला जगाच्या सर्वात उंचावर बघत आहे. माझे ब्रेस्ट कॅन्सरचे फॉलोअप स्कॅन परफेक्ट आले आहे. माझी तब्येत देखील ठीक असून, डॉक्टर देखील माझी प्रगती पाहून आनंदी आहे. एका डॉक्टरांनी मला विचारले तुला भीती कशी वाटत नाही? मी एवढ्या लवकर कशी काय बरी झाली? मी हे सर्व कसे केले? या प्रश्नांचे उत्तरं देण्यासाठी माझ्याकडे खरंच उत्तरं नव्हते. मला वाटते काही करण्याआधी मी जास्त विचार करत नाही. आयुष्याने तुमच्यासाठी आधीच काही ठरवले असते. त्यामुळे आपण या परिस्थितीचा सामना केलाच पाहिजे. आपल्याला फक्त साथ दयायची. म्हणूनच मी आनंदी राहणे पसंत करते. हो ना? मस्त वाटते”
View this post on Instagram
सध्या छवी दुबईमध्ये तिच्या सुट्ट्या एन्जॉय करत आहे. या सुट्ट्यांचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले असून, यामध्ये तिने तिच्या बिकिनीचे आणि तिच्या मुलांचे, नवऱ्याचे फोटो आहे. या मध्ये तिने तिचा एक असा फोटो शेअर केला आहे, ज्यात ती तिच्या ऑपरेशनचे मार्क फ्लॉन्ट करत आहे. यासोबत तिने लिहिले होते की, या मार्कला दाखवताना तिला अभिमान वाटतो, मात्र लोकं तिला हे निशाण लपवण्यास सांगतात. यासोबतच तिने २०२२ वर्षाने तिला हे दिल्याचे देखील सांगितले आहे.
छवीने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या असून, ती स्वतःचे यूट्यूब चॅनल चालवते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘छोरी २’ सिनेमाच्या सेटवर जखमी झाली नुसरत भरुचा, व्हायरल झाला व्हिडिओ
शाहरुख खान ठरला खरा ‘रईस’, श्रीमंत कलाकारांच्या यादीत हॉलिवूड स्टार्सला देखील टाकले मागे