बॉलिवूड आणि क्रिकेट विश्वातील अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय जोडी म्हणून अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचे नाव येते. या दोघांचे जगभरात असंख्य फॅन्स आहेत. या दोघांकडे एक परफेक्ट कपल म्हणून पाहिले जाते. हे दोघं नेहमीच एकमेकांना कॉम्प्लिमेंट करत असतात. मागील काही काळापासून अनुष्का आणि विराट सतत लाइमलाईट्मधे आहे.
आता पुन्हा एकदा अनुष्का शर्माच्या पोस्टमुळे ही जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. श्रीलंका आणि भारत यांच्यात एकदिवसीय सामने चालू आहे. यातच नुकताच यांच्यात एक सामना झाला. यादरम्यान विराटने दमदार फलंदाजी करत त्याचे धमाकेदार ४५ वे शकत ठोकले आणि संपूर्ण भारतीयांची मने जिंकली. याचाच आनंद व्यक्त करताना अनुष्का शर्माने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. सध्या सोशल मीडियावर हा फोटो तुफान व्हायरल होत असून, त्यावर भरभरून कमेंट्स येत आहेत.
विराट शर्माने भारताला श्रीलंकेविरोधात जिंकावण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली. त्याने केवळ ८७ चेंडूंमध्ये ११३ धाव करत एक दमदार परी खेळली. आपल्या नवऱ्याच्या या तुफानी खेळीमुळे आनंदी झालेल्या अनुष्काने तिचा आनंद सोशल मीडियावर व्यक्त केला आहे. तिने इन्स्टा स्टोरीवर विराटचा शतक झळकावल्यानंतरचा एक सुंदर फोटो पोस्ट केला असून, त्यावर हार्ट ईमोजी टाकले आहे. या फोटोमध्ये विराट शतक झाल्यानंतर हातात बॅट घेऊन दोन्ही हात उंचावत देवाला धन्यवाद म्हणत आहे.
काही दिवसांपूर्वीच विराट आणि अनुष्का यांनी वामिकासोबत नवीन वर्षाच्या सुरुवातीला वृंदावन मथुरेत जाऊन देवाचे आणि संत महात्म्यांचे आशीर्वाद घेतले. त्यांचे या ट्रिपचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. यावर्षी या तिघांनी त्यांचे नवीन वर्ष दुबईमध्ये साजरे केले. तिथून परतल्यावर त्यांनी नवीन वर्षात देवाचे आशीर्वाद घेऊन वारसाची सूर्यवंत करण्यासाठी ही ट्रिप केली होती. तत्पूर्वी लवकरच अनुष्का तिचे कमबॅक करत ‘चकदा एक्सप्रेस’ सान्म्त दिसणार आहे. यात ती एका महिला क्रिकेटरच्या भूमिकेत दिसेल.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘छोरी २’ सिनेमाच्या सेटवर जखमी झाली नुसरत भरुचा, व्हायरल झाला व्हिडिओ
शाहरुख खान ठरला खरा ‘रईस’, श्रीमंत कलाकारांच्या यादीत हॉलिवूड स्टार्सला देखील टाकले मागे