मनोरंजनविश्वातील ड्रामा क्वीन म्हणून राखी सावंत ओळखली जाते. कोणतीही गोष्टी मीडियासमोर करण्यात तिला सर्वात जास्त आवडते. आजपर्यंत ती तिचे वागणे, बोलणे, बेताल वक्तव्य, बॉयफ्रेंड, वैयक्तिक आयुष्य आदी गोष्टींमुळे चर्चेत असते. याच राखीने आता गुपचूप लग्न करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. राखीने जेव्हा ती आदिल खानसोबत रिलेशनशी असल्याचे जाहीर केले, तेव्हापासून ती सतत त्याच्यासोबतच स्पॉट केली जात होती. या दोघांची जोडी सोशल मीडियावरही चांगलीच हिट होती, किंबहुना आहे.
View this post on Instagram
आता याच राखीने आदिल खानसोबत कोर्ट मॅरेज केले असून, त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल होत आहे. या फोटोंमध्ये ती आणि आदिल दिसत असून, यात त्यांच्या लग्नाचे सर्टिफिकेट दाखवणारा एक फोटो देखील आहे. तिचे हे फोटो पाहून सर्वच हैराण झाले आहे. आता राखी आणि आदिल या दोघांनी त्यांच्या नात्याला नाव दिले आहे. या व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये या दोघांच्या गळ्यात हार देखील दिसत आहे. यामध्ये एक फोटो त्यांच्या सर्टिफिकेटचा देखील फोटो असल्याने, त्यावरून लक्षात येते की, त्यांनी ७ जानेवारी २०२२ रोजी मुंबई कोर्टात लग्न केले आहे. राखी आणि आदिल नेहमीच सार्वजनिक ठिकाणी मीडियासमोर त्यांचे एकमेकांवरील प्रेम व्यक्त करताना दिसत होते. हे दोघं एकमेकांच्या घरी, दुबई ट्रीपला देखील एकत्र गेले होते.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये राखीने पांढऱ्या आणि गुलाबी रंगाचा शरारा ड्रेस घातला असून, आदिल अतिशय सध्या कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे. त्याने काळ्या रंगाचा शर्ट आणि डेनिम घातलेली आहे. त्यांनी त्यांचे मॅरेज सर्टिफिकेट साइन करतानाच फोटो देखील शेअर केला आहे. राखी मनोरंजनविश्वात काम करते तर आदिल एक व्यावसायिक आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘छोरी २’ सिनेमाच्या सेटवर जखमी झाली नुसरत भरुचा, व्हायरल झाला व्हिडिओ
शाहरुख खान ठरला खरा ‘रईस’, श्रीमंत कलाकारांच्या यादीत हॉलिवूड स्टार्सला देखील टाकले मागे










