टेलिव्हिजनविश्व ओळखलेच मालिकांमुळे जाते. मालिका आणि टीव्ही जगताचे खूपच वेगळे आणि सुंदर नाते आहे. या मालिकांची पोहच आणि प्रसिद्धी बघता अनेक सिनेस्टार देखील याकडे वळतात. मराठी मालिका आणि त्यांमध्ये हाताळले जाणारे नवनवीन विषय सर्वांनाच आवडतात. मागील काही वर्षांपासून झी मराठीवर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ नावाची मालिका सुरु आहे. श्रेयश तळपदे आणि प्रार्थना बेहेरे यांची मुख्य भूमिका असणाऱ्या या मालिकेने खूपच कमी काळात प्रेक्षकांचे प्रेम आणि यश मिळवले. मात्र आता ही मालिका लवकरच बंद होणार आहे.
मागील बऱ्याच महिन्यांपासून ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका बंद होणार असे बोलले जात होते. मात्र प्रेक्षकांचे मालिकेवरील प्रेम पाहून ही मालिका काही महिन्यांसाठी पुन्हा वाढवली, फक्त मालिकेची वेळ बदलली गेली, आणि कडचणीत इथेच चूक झाली. मालिकेची वेळ बदलली आणि याचा मालिकेला चांगलाच फटका बसला. प्रेक्षकांचा कमी प्रतिसाद बघता ही मालिका आता लवकरच बंद होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रार्थना बेहेरेने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून तिच्या या मालिकेच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवसाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
View this post on Instagram
प्रार्थनाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती लाल रंगाच्या साडीमध्ये रस्त्यावरून धावताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना तिने ‘शूटिंगचा शेवटचा दिवस’ असे म्हणत शेअर केला आहे. याआधी मालिकेत परीची भूमिका साकारणाऱ्या मायरा वैकुळने देखील तिच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवसाचा व्हिडिओ शेअर केला होता. पहिल्या पतीपासून वेगळ्या राहणाऱ्या आणि एका लहान मुलीची आई असणाऱ्या नेहाच्या आयुष्यात अतिशय श्रीमंत आणि शिक्षित असा यश येतो आणि सुरु होते त्याची कहाणी. अशी साधी सरळ ही मालिका होती, मात्र तरीही या मालिकेला प्रेक्षकांचे तुफान प्रेम मिळाले.
सतत चित्रपटांमध्ये दिसणाऱ्या प्रार्थनाला प्रेक्षकांना मालिकेमध्ये पाहायचे होते. म्हणूनच प्रार्थनाने ही मालिका स्वीकारली आणि प्रेक्षकांची इच्छा पूर्ण केले.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘छोरी २’ सिनेमाच्या सेटवर जखमी झाली नुसरत भरुचा, व्हायरल झाला व्हिडिओ
शाहरुख खान ठरला खरा ‘रईस’, श्रीमंत कलाकारांच्या यादीत हॉलिवूड स्टार्सला देखील टाकले मागे