Wednesday, December 25, 2024
[aioseo_breadcrumbs]

उर्फी जावेदवर चित्रा वाघ यांची संतप्त प्रतियक्रिय; म्हणाल्या, ‘आज हिला थांबवल नाही तर उद्या…’

गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यामध्ये सोशल मीडिया वॉर होताना पाहात आहोत. चित्रविचित्र फॅशेन करुन प्रसिद्धी झोतात आलेल्या उर्फीच्या कपड्यांवर चित्रा वाघ यांनी आक्षेप केला असून तिच्याविरोधात तक्रारही नोंदवली होती. मुंबई पोलिसांनी उर्फीला (दि, 14 जानेवारी) रोजी चौकशीसठी देखिल बोलवले होते. अता या प्रकरणावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिय व्यक्त केली आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) याचा वाद अजूनच चिघळत आहेत. चित्रा वाघ यांनी उर्फी विरोधात तक्रार नोंदवली असून ‘कुठे भेटली तर तिला थोबडवेन’ असंही त्या म्हणाल्या होत्या. चौकशीनंतर उर्फीने तिच्या ट्वीटर अकाउंटवरुन ऐतिहासिक मुर्त्याचे फोटो शेअर करत आधी तुम्ही हिंदू संस्कृतीबद्दल शिका आणि मग मला सांग असं उर्फीने तिच्या ट्वीटद्वारे सागितलं होत. यानंतर चित्रा वाघ यांनी उर्फीला प्रतिउत्तर दिलं आहे.

चित्रा वाघ यांनी माध्यमांशी दिलेल्या मुलाखतीदरम्यान सांगितले की, त्या त्यांच्या मतावर ठाम आहेत. चित्रा वाघ म्हणाल्या की, “कालपासून मुंबई पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे असं मला कळालं. कारण मी तर प्रवासामध्ये आहे. मी पुन्हा तुम्हाला सांगते की, मी वकील नाही. पण या प्रकरणात काय होऊ शकतं आणि काय नाही याची मला पूर्ण कल्पना आहे. तरीही तुम्हाला जाब विचारणारं महाराष्ट्रात कोणीतरी आहे हा मला संदेश द्यायचा आहे.”

चित्रा वाघ पुढे म्हणाल्या की, “आज जर हिला थांबवलं नाही तर तिच्यासारख्या अजून 10 जनी नग्न फिरतील, तेव्हा आपण काय कारयचं? आपल्याला हे मान्य आहे का? मी पुन्हा एकदा सांगत आहे की, विरोध त्या व्यक्तीला नाही तर तिच्या विकृतीला आहे. यामध्ये धर्म किंवा आणखी काही वेगळा रंग देण्याचा प्रयत्न करु नाका.” चित्रा वाघ आणि उर्फीचं प्रकरण किती वाढेल आणि कोणतं नवीन वळन घेइल हे पाहाने खूपच महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
बिग बाॅसमधील पुरुष स्पर्धकांनी केलं मुलीचं रुप धारण, पाहून महिला स्पर्धकांनाही बसेल धक्का
तर ‘या’ कारणासाठी ओ.पी.नय्यर यांनी कधीच केले नाही लता मंगेशकर यांच्यासोबत काम

हे देखील वाचा