Wednesday, October 15, 2025
Home बॉलीवूड सुकेशला भेटण्यासाठी बीएमडब्ल्यूमध्ये जायची अभिनेत्री; एका भेटीचे मिळायचे ‘इतके’ रुपये, वाच सविस्तर

सुकेशला भेटण्यासाठी बीएमडब्ल्यूमध्ये जायची अभिनेत्री; एका भेटीचे मिळायचे ‘इतके’ रुपये, वाच सविस्तर

बाॅलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आजकाल तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सतत चर्चेत आहे. सुकेश चंद्रशेखरच्या 200 कोटी रुपये फसवणुकी प्रकरणात जॅकलीन सतत काेर्टच्या फेऱ्या मारत असते.  जॅकलिन व्यतिरिक्त आणखी एक अभिनेत्री आहे जी सुकेश चंद्रशेखरमुळे कायदेशीर अडचणीत अडकली आहे. ती अभिनेत्री म्हणजे नोरा फतेही. पण, दावा केला जात आहे की या दोन अभिनेत्रींशिवाय आणखी एक अभिनेत्री आहे जिचे नाव आता सुकेश चंद्रशेखरच्या फसवणूक प्रकरणात समोर आले आहे. ही अभिनेत्री अनेकदा सुकेश भेटण्यासाठी तिहार तुरुंगात जात असे. काय आहे नेमके प्रकरण? चला जाणून घेऊया…

दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या 200 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात, असा दावा केला जात आहे की, एप्रिल-मे 2018 मध्ये सुकेशला भेटण्यासाठी तीन अभिनेत्री/मॉडेल तिहार तुरुंगात पोहोचल्या होत्या. पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात या तिन्ही अभिनेत्रींनी पोलिसांनी केलेल्या चौकशीत सुकेशशी संबंधित सर्व गुपिते उघड केल्याचे म्हटले आहे. या अभिनेत्रींच्या वक्तव्यावरून असे दिसून येते की, सुकेशने तिहार तुरुंगातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना लाच देऊन त्यांना आपल्या बाजूने घेतले होते, ज्यांच्याकडून तो भरपूर फायदा घेत असे.

तुरुंगात असतानाही सुकेश सुखी जीवन जगत होता. दिल्ली पोलिसांनी आपल्या आरोपपत्रात म्हटले आहे की, या अभिनेत्री सुकेशला भेटण्यासाठी 1 ते 1.5 लाख रुपये घेत असत आणि 45 मिनिटे ते 1 तास भेटत असत. इतकंच नाही तर जेव्हा एखादी अभिनेत्री सुकेशला भेटायला यायची, तेव्हा तिला एक खास खोली दिली जायची, जिथे टीव्ही, फ्रीज आणि एसीची व्यवस्था केली जायची. येथे तो अभिनेत्रींना भेटत असे. मात्र, या तिसऱ्या अभिनेत्रीचे नाव अद्याप समोर आलेले नाही. या सर्व गोष्टी या अभिनेत्रींनीच चौकशीदरम्यान सांगितल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे.अभिनेत्रींनी असेही सांगितले की, ‘जेव्हा त्यांना सुकेशला भेटण्यासाठी तिहारला जायचे होते, तेव्हा एक बीएमडब्ल्यू कार त्यांना घेण्यासाठी यायची, जी तीन क्रमांकाच्या गेटमधून तुरुंगात जायची.’

या प्रकरणी तिहार तुरुंगाचे माजी महासंचालक संदीप गोयल यांना निलंबित करण्यात आले आहे.(sukesh chandrashekhar money laundaring ase not only actress jacqueline fernandez and actress nora fatehi one another bollywood actress used to meet conman)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
राखी सावंत बनली ‘गंगूबाई’! बुरखा-हिजाबमध्ये पोलिस स्टेशनबाहेर पडली अन्…

पारंपरिक वेशभूषेत मालविकाने जिंकले चाहत्यांचे मन, फोटो गॅलेरी पाहाच

हे देखील वाचा