Saturday, August 9, 2025
Home बॉलीवूड नम्रता शिरोडकरला या एका चुकीमुळे गमवावा लागला मिस युनिव्हर्सचा ताज; युजर्स म्हणाले, ‘हा मूर्खपणा…’

नम्रता शिरोडकरला या एका चुकीमुळे गमवावा लागला मिस युनिव्हर्सचा ताज; युजर्स म्हणाले, ‘हा मूर्खपणा…’

साऊथ सुपरस्टार महेश बाबूसोबत लग्न केल्यानंतरच अभिनेत्री नम्रता शिरोडकर फिल्मी जगापासून दुरावले. बऱ्याच दिवसांपासून ती कोणत्याही चित्रपटात दिसलेली नाही. पण, तुम्हाला माहीत आहे का? की, नम्रताने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. होय, अभिनेत्रीने भारतातून मिस युनिव्हर्स 1993 स्पर्धेत भाग घेतला आणि खूप पुढे गेली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये नम्रता शिरोडकर प्रश्नोत्तराच्या फेरीत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिसत आहे.

नम्रता शिरोडकर (namrata shirodkar) हिचा मिस युनिव्हर्स 1993 चा जुना व्हिडिओ शेअर केला जात आहे, ज्यामध्ये नम्रताला विचारले आहे की, ‘जर तिला कायमचे जगण्याची संधी मिळाली तर ती काय करेल आणि का?’ यावर नम्रताने दिलेले उत्तर नेटकऱ्यांचे समाधान करू शकले नाही. उत्तरात अभिनेत्री म्हणते, ‘मला कायमचे जगायला आवडणार नाही. मला वाटतं मी कायम जिवंत राहू शकत नाही.” जजला नम्रताचे हे उत्तर आवडले नाही आणि कदाचित याच कारणामुळे तिचा मिस युनिव्हर्स 1993 पासूनचा प्रवास सहाव्या क्रमांकावर संपला.

नम्रताचा जुना व्हिडिओ पाहून नेटिझन्सचे म्हणणे आहे की, केवळ मिस युनिव्हर्सचे जजच नाही तर भारतातील लोकही तिच्या उत्तराने समाधानी होणार नाहीत. नम्रताच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एका युजरने याला ‘मूर्ख’ म्हटले आहे. तर काहींनी सांगितले की, या उत्तरामुळे नम्रता मिस युनिव्हर्स 1993 स्पर्धेतून बाहेर पडली. एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘मला तिचे उत्तर आवडले नाही.’ तर आणखी एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘हा एक काल्पनिक प्रश्न आहे, त्यानुसार नम्रताने उत्तर द्यायला हवे होते.’

नम्रता ही 90 च्या दशकातील टॉप अभिनेत्रींपैकी एक होती, पण लग्नानंतर तिने इंडस्ट्रीला अलविदा केला आणि आता ती तिच्या कुटुंबाकडे पूर्ण लक्ष देत आहे.(tollywood mahesh babu wife namrata shirodkar lost miss universe 1993 crown due to dumb answer internet thinks video viral )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ब्रेकिंग! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्यााल अटक, अभिनेत्रीला त्रास आणि अश्लील मेसेज पाठवण्याचा लावला आरोप

अखेर निरोपाची वेळ आलीच…माझी तुझी रेशीमगाठ मालिकेचा ‘या’ दिवशी प्रसारित होणार शेवटचा भाग

हे देखील वाचा